सोशल मीडियावर प्रसिद्धी लोक काय करतील काही सांगता येत नाही. व्हिडीओवर काही लाईक्स अन् शेअर मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडत आहे. सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ समोर येतात जे पाहून धक्का बसतो अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क सिगारेट ओढत आहे अन् कोणीतरी त्याचा व्हिडिओ शुट करत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलांच्या पालकांना नेटकऱ्यांनी दोष दिला आहे.
पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या मुलांवर योग्य संस्कार व्हावे ही पालकांची जबाबदारी असते. चुकीच्या संगतीत मुलं चुकीच्या गोष्टी शिकतात त्यामुळे पालकांना नेहमी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. पण व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुल चक्क सिगारेट ओढताना दिसत आहे. तो जिन्यावर बसलेला आहे अन् सिगारेट ओढून तो धूर बाहेर सोडताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून लक्षात येते की, चिमुकल्याला कोणीतरी सिगारेट ओढायला शिकवले आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे चिमुकल्याला ओरडण्याऐवजी कोणीतरी त्याचा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओ शुट करणाऱ्या व्यक्तीवर देखील टिका केली आहे.
अनेकदा लहान मुलं चुकीच्या सवयींच्या आहारी जातात अशा वेळी त्यांना प्रेमाने समजावे लागते. पण कोणीतरी मुलाला सिगारेट ओढू नये सांगण्याआधी त्याचा व्हिडिओ शुट करत आहे हे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे. अनेकांनी चिमुकल्याच्या पालकांना दोष दिला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत पालकांवर आणि व्हिडिओ शुट करणार्यांवर टिका केली आहे. अनेकांनी असाही दावा केला की, प्रसिद्धीसाठी चिमुकल्याच्या पालकांनीच व्हिडिओ शुट केला असावा. पण सत्य अद्याप समोर आलेले नाही. चिमुकल्याचा चेहरा ब्लर केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.
kalyani.lifex नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “त्याला सिगारेट पेटवून दिली आणि व्हिडीओसाठी फालतूपणा केला आहे कोणीतरी.”
दुसऱ्याने कमेंट केली,” म्हणजे फक्त व्हिडिओ आणि लाईक्स मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीला जात आहेत लोक, निष्पाप मुलाचा देखील फायदा घेत आहेत”
तिसऱ्याने कमेंट केली की, “तुम्ही आधी व्हिडिओ बनवा आणि नंतर त्याच्या हातातून सिगारेट काढून घ्या.”
चौथ्याने कमेंट केली की, जो व्हिडिओ शुट करत आहे त्याचेच काम आहे, हे सर्व व्हिडिओसाठी केले, इतके आंधळे झालेत की,”लेकराच्या आयुष्याशी खेळत आहेत. एका लाईक अन् कमेंटसाठी अजून किती खालच्या पातळीला जाणार आहात.
पाचव्याने कमेंट केली, “व्हिडिओ बनवण्यापेक्षा लेकराच्या आरोग्याची काळजी घ्या.”
सहाव्याने कमेंट केली की, “वेडे आहात का, लेकराला सिगारेट देऊन व्हिडिओ बनवत आहात”
सातव्याने कमेंट केली, “त्याला सिगारेट पेटवून कोणी दिली, व्हिडीओच्या नादाता फालतू नाटक करू नका प्लिज”
आठव्याने कमेंट केली की,”तुम्ही हे व्हिडिओ प्रसिद्धीसाठी बनवत आहात?! पण का ते मला समजत नाहीये, असे व्हिडिओ कोण बनवू इच्छिते. तेही त्यांच्या स्वतःच्या मुलांबद्दल. मला वाटते की त्या मुलाला सिगारेट हातात घेऊन अभिनय करायला सांगितले जाते! हे चांगल्या पालकत्वाचे लक्षण नाही का?”