Mother Emotional Video Viral: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.
परिस्थिती सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, जगणं खूपच अवघड होऊन जातं. पण याच अवघड असलेल्या जीवनाला आनंदाची गोडी कशी लावावी हे शिकता आलं पाहिजे. लहान सहान गोष्टींमधून आनंद मिळवता आला पाहिजे. तेव्हाच जगण्याचा खरा अर्थ कळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक वयोवृद्ध आई खूप आनंदी आहे, आणि तिच्या भावना व्यक्त करताना ती भावूकही झालीय, नेमकं त्या आईबरोबर असं काय घडलंय, जाणून घेऊ…
आईचा आनंद (Mother Emotional Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक वयोवृद्ध महिला खूप आनंदी दिसत आहे. तिच्या हातात एक नवाकोरा मोबाईल आहे. आपल्या मुलाने आपल्याला मोबाईल घेऊन दिला या भावनेनेच तिचं हृदय भरून आलं आहे. तिच्या मुलाने घेऊन दिलेला फोन ती सगळ्यांना दाखतेय. यादरम्यान, तिच्या डोळ्याच आनंद अश्रू दिसत आहेत. तसंच हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @the.marathi.man या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल ३ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तर “गरिबीची स्वप्न खूप मोठी नसतात. मुलाने आईला घेऊन दिलेला मोबाईल आणि आनंद” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “देव आहे… पण आई बापामध्ये शोधता आला पाहिजे” तर दुसऱ्याने “डोळे पाणावले….माऊलीच्या मुलाने खरं तर सर्व सुख आणि संपूर्ण जगाची संपत्ती कमावली” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “किती भोळी असते ना आई” तर, “आनंद कधी कधी छोट्या गोष्टीतही आभाळाएवढा भेटतो हेच खरं” अशी एकाने कमेंट केली.