पालकांबरोबर मुलं कुठेही बाहेर गेली की, त्यांच्या लहानशा आवाजात दिसतील त्या गोष्टींचे हट्ट सुरू करतात. मग कधी त्यामध्ये ‘आई, मला हे चॉकलेट घेऊन दे ना’ ते ‘बाबा मला हा खेळ घेऊन द्या ना’ इथपर्यंत कोणत्याही वस्तूची मागणी मुलांकडून केली जाते. अशात त्यांचा एखादा हट्ट पुरवला नाही, त्यांनी जे काही सांगितले ते दिले नाही की ती भोकांड पसरतात किंवा चिडचिड करतात. पण, आता एखाद्या चिमुकल्याने नुसताच ‘मला काहीतरी दे, काहीतरी दे’, असा जप सुरू ठेवला, तर तुम्ही काय कराल?

अशाच एका हट्टाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर shivanyaa_borade नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेमके यात काय आहे ते पाहू. सुरुवातीला काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेली एक चिमुकली मुलगी अगदी कावऱ्याबावऱ्या आवाजात, “मला काहीतरी हवंय”, असं म्हणत फ्रिजजवळ जाते. त्यामधील सगळ्या गोष्टींकडे बघूनही पुन्हा तसेच प्रश्नार्थक वाक्य उच्चारत आईकडे मागणी करीत राहते. तिच्या या प्रश्नावर व्हिडीओ शूट करणारी तिची आई तिला विचारते, “तुला काय हवंय? खजूर खायचा आहे का?” असे फ्रिजमधील एक पिशवी उचलून विचारते. तरी ती चिमुकली नाही म्हणते.

हेही वाचा : ‘टिश्यू पेपर’ने बनवा मोगऱ्याचा गजरा! पाच मिनिटांत करून बघा ‘हा’ जुगाड! पाहा Video…

नंतर ती लहान मुलगी ओट्याजवळ जाऊन आईला, “मला काहीतरी खायला बनवून दे.” पण, नेमके काय ते सांगत नाही. त्यामुळे “अगं, पण काय बनवून देऊ तुला? काहीतरी म्हणजे नेमकं काय असतं”, असा उलट प्रश्न केल्यावर मात्र ती चिमुकली खूपच कावरीबावरी होते. चिडचिड करून पुन्हा पुन्हा एकच मागणी करीत राहते. शेवटी आई तिला वेगवेगळ्या पदार्थांची नावं घेऊन हे देऊ का – ते देऊ का?, असे विचारते. मात्र, त्यातूनदेखील काही साध्य होत नाही. व्हिडीओच्या शेवटी “दे ना – दे ना… मला काहीतरी दे ना”, असे म्हणत ती चिमुकली आरडाओरड करून जवळपास भोकांड पसरते एवढेच दिसते.

अत्यंत मजेशीर वाटणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या पाहा.

“काहीतरी हवं आहे; पण नेमकं काय हवंय ते सांगतच नाहीये ती…” अशी प्रतिक्रिया एकाने लिहिली आहे. “असं तर मोठ्यांचंसुद्धा होतं”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्याने लिहिली आहे. “तिला बाहेर जायचं आहे… मुलांना असं सांगता येत नाही नीट”, असे तिसऱ्याने लिहिले आहे. चौथ्याने, “सेम टू सेम.. माझी मुलगीसुद्धा असंच करत असते”, असे म्हटले आहे. शेवटी पाचव्याने, “तिला दोन फटके द्या.. म्हणजे पोट भरेल”, अशी मिश्कील प्रतिक्रिया लिहिली आहे.

हेही वाचा : कहर झाला! चक्क ‘ताकात’ शिजवला पास्ता! Video पाहून नेटकरी हैराण; म्हणाले “विषापेक्षा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ६९५K इतके व्ह्युज मिळाले आहेत.