Girls Dancing In Flood Water : सोशल मीडियाचा काही लोकांवर इतका परिणाम झाला की, त्यावर प्रसिद्ध होण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकता. प्रसिद्धाच्या नादात हे लोक आपला जीवही धोक्यात घालताना मागे पुढे पाहत नाहीत, तर काहीवेळा स्वत:चे हसू करून घेतात. यात विशेषत: काही तरुणी कोणताही धोका लक्षात न घेता रिल्स बनवण्यासाठी रस्त्यावर, कधी कुठेही उभं राहून नाचायला सुरु करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे रस्त्यावर पुराचे धो-धो पाणी वाहत असल्याने लोकं त्रस्त झालेले दिसत आहेत. मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काही तरुणी कसलीही पर्वा न करता पुराच्या पाण्यात रिल्स बनवण्यासाठी नाचताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डोंगराळ भागातील एका रस्त्यावर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. डोंगरावरील पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने नागरिकांना रस्त्यावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या एका बाजूला अनेक वाहन चालक पुराचे पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत. तर एक जेसीबी मशिन रस्त्यावरील दगड हटवताना दिसत आहे. पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काही तरुणी कसाही विचार न करता जीव धोक्यात घालून रिल बनवण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरल्या आहेत. यातील दोन तरुणी पाण्याच्या मधोमध जाऊन नाचू लागतात आणि एक तरुणी समोर उभी राहून त्यांचा व्हिडिओ शूट करते. यावेळी अचानक जर पुराचे पाणी वाढले असते तर ते तरुणींच्या जीवावर बेतू शकले असते, पण त्याचा विचार करता ह्या तरुणी सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी चक्क पुराच्या पाण्यात उभ्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडेच @trollpokhara इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो आता तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, मला वाटत होते दोन्ही मुली घसरून पडतील. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, असे दिसते की, जणू काही लोक त्यांना थेट पाहण्यासाठी तेथे जमले आहेत. यावर तिसऱ्या युजरने लिहिले की, काही वेळात पाणी त्यांना घेऊन जाईल. तर चौथ्या युजरने, देव त्यांना थोडी बुद्धी देवो, अशी मागणी करत आहे.