National Girlfriend Day: आज नॅशनल गर्लफ्रेंड डे आहे. दर १ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ज्यांच्या गर्लफ्रेंड्स आहेत, ते लोकं वेळ काढून सेलिब्रेशन करतात. खरंतर दिवसांच्या या मांदियाळीत गर्लफ्रेंड डे सोबत बॉयफ्रेंड डे देखील साजरा केला जातो. हा दिवस ३ ऑक्टोबर ला साजरा केला जातो. ज्या मुलांची गर्लफ्रेंड आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे. पण या दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीलाही समर्पित करू शकता. काळजी करु नका तुमच्या लेडी लव्हचा हा दिवस खास बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही हटके आयडीया घेऊन आलो आहोत. हे सरप्राईज प्लॅन करून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला खुश करू शकता.
सरप्राइज डेट प्लॅन करा
नॅशनल गर्लफ्रेंड डे साजरा करण्यासाठी तुमच्या गर्लफ्रेंडला सरप्राईज द्या आणि एखाद्या खास ठिकाणी डेट प्लॅन करा. इथे तुम्ही तिच्या आवडत्या पदार्थांसोबत तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता.
लव्ह लेटर
तसं तर आता मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात लव्ह लेटरचे क्रेझ नाही. पण तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुमच्या गर्लफ्रेंडला एक क्युटसे रोमँटिक पत्र किंवा नोट लिहू शकता.
तिच्यासाठी जेवण बनवा
आजच्या खास दिवशी तुम्ही तिच्यासाठी तिची आवडती डीश बनवू शकता, तसेच तिच्यासाठी तिच्या आवडीचा केक बनवून तिला खूश करु शकता. तुम्ही स्वत: बनवलेले पदार्थ पाहून तिला नक्की आनंद होईल
सोशल मीडियापासून दूर राहा
हा खास दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सोशल मीडियापासून अंतर ठेवा. तुमच्या गर्लफ्रेंडसोबत पूर्ण दिवस घालवा आणि क्वालिटी टाईम स्पेंड करा. जेणेकरून हा दिवस संस्मरणीय होईल.
गर्लफ्रेंडच्या छंदात इंटरेस्ट दाखवा
जर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या प्रेयसीच्या कोणत्याही छंदाकडे दुर्लक्ष करत असाल तर आता तिच्या छंदात रस दाखवा. त्यामुळे तिला खास वाटण्यासाठी हा दिवस आहे, म्हणून तिचा छंद किंवा आवड समजून घ्या आणि या दिवशी तिला पूर्ण वेळ द्या.
हेही वाचा – मुलं लिफ्टमधून बाहेर पडताच १०व्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
आवडत्या अॅक्टिव्हिटी प्लॅन करा
जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला खूश करायचे असेल तर तिच्या आवडत्या अॅक्टिव्हिटीचे प्लॅन करा आणि तिला सरप्राईज करा. ज्याला पाहून तिला नक्कीच आनंद होईल.