म्हणतात ना आयुष्य खूप सुंदर आहे ते फक्त आनंदाने जगता यायला पाहिजे! प्रत्येक क्षण आनंदाने जगणे हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य मोजक्याच लोकांकडे असते जे इतरांची पर्वा न करत समोर आलेला क्षण आनंदाने आणि उत्साहाने जगतात. अशा लोकांना पाहून इतरांच्या चेहऱ्यावर हसू येते आणि इतरांनाही आनंदी राहण्याची प्रेरणा मिळते. अशा प्रकारे प्रत्येक क्षण आनंदाने जगणाऱ्या आजीबाईंच्या व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही नक्की हसू येईल.

सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये काही नेटकऱ्यांना पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये ६० वर्षाच्या आजीबाई चक्क नागीण डान्स करताना दिसत आहे. आजीबाईंचा डान्स पाहून नेटकऱ्यांना आपले हसू आवरणे अवघड जात आहे.

हेही वाचा – खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा – थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”

व्हिडिओ एका न्यु होम मिनिस्टर नावाच्या पेजवर पोस्ट केलेला आहे. सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रम म्हणून अनेकदा सणासुदीच्या काळात असे कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे नेहमी घर आणि संसारात रमलेल्या गृहिणींना काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळते. विविध स्पर्धा आयोजित करून गृहिणी आणि महिलांचे मनोरंजन केले जाते. अनेकदा आकर्षक बक्षीसांचे वाटप केले जाते. अशाच एका कार्यक्रमातील एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे ज्यामध्ये व्यासपीठावर उभ्या असलेल्या ६० वर्षांच्या आजीबाई चक्क नागीण डान्स करताना दिसत आहे. आजीबाईंनी ज्या पद्धतीने नागीण डान्स केला आहे ते पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. व्हिडीओमध्ये आणखी दोन आजीबाई स्टेजवर दिसत आहे ज्या नागीण डान्स करत आहे.

हेही वाचा – तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या पद्धतीने आजीबाई मनमोकळेपणाने नाचत आहे, प्रत्येक क्षण आनंदाने जगत आहे ते पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.