नृत्य ही कला आहे जी जोपासली जाते, ते कौशल्य आहे जे आत्मसात केले जाते. काही लोकांना ही कला जन्मजात अवगत असते तर काही लोक प्रचंड मेहनत घेऊन हे कौशल्य आत्मसात करतात. सोशल मीडियावर असे अनेक नृत्य करणाऱ्या कलाकारांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यात एखादा व्हिडिओ असा असतो जो प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.

फार कमी लोक असे असतात ज्यांच्या कानावर संगीत पडताच त्यांची पाऊले थिरकतात, फार कमी लोक असतात ज्यांना ढोलकीची थाप ऐकताच ते नाचू लागतात. सध्या अशाच एका कलाकार चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

डीजेच्या तालावर अनेक तरुण मंडळी थिरकतात पण व्हिडीओमध्ये चिमुकला फक्त नाचताना दिसत नाही तर वादन करतानाही दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुकला ढोलकीच्या तालावर आणि पेटीच्या नादावर नाचताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. काही लोक त्याच्या नृत्याला दाद देताना दिसत आहे. त्यानंतर हा चिमुकला थेट तबला वाजवताना दिसतो तेही अगदी अचूकपणे. चिमुकल्याच्या या कलेने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर darshan_watkar या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हॅशटॅग कोकण भजन असे लिहिलेले आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिमुकल्याचे कौतुक केले आहे.

एकाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, “कला ही माणसाला नशीबाने मिळते, वा रे पट्ट्या! कडक भावाने माहोल केला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एकाने कमेंट केली की, वा रे पठ्या! लई भारी. आम्हाला तर या वयात ताल कुठे आणि सूर कुठे कळतं नव्हते आणि आजही तीच अवस्था आहे म्हणा”