Viral Video : शेतकरी राब राब राबतो अन् शेतात पिक पिकवतो. त्याच्यामुळे संपूर्ण जगाला खायला अन्न मिळते त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र या पोशिंदावर अनेकदा बिकट परिस्थिती येते पण तो न डगमगता परिस्थितीशी दोन हात करतो. शेतकऱ्याचा एकच मित्र असतो, तो म्हणजे बैल. उन्हा-पावसात फक्त बैलावर अवलंबून राहून शेतकरी राजा हिंमतीने शेती करताना दिसतो. शेतकरी आणि बैलाच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला बैलाला ‘बाप’ म्हणून आयुष्यभर सांभाळणार, असे सांगताना दिसतो. चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण चिमुकल्याला घेऊन उभा असतो हा चिमुकला या तरुणाशी गोड संवाद साधताना दिसतो. व्हिडीओमध्ये चिमुकला म्हणतो, “लग्न झाले नाही तरी चालेल. माझ्या आई बाबांच्या अपेक्षा पूर्ण करीन. कायम बैलाबरोबर राहीन. त्या बैलाला बाप म्हणून सांभळणार मी.” त्यावर तरुण म्हणतो, “याला शाळेत घाला. शाळा शिकवा. तुम्ही नाद जपा. तुमच्याघरी बैल घ्या त्यासाठी दुमत नाही पण नुसता नाद करून उपयोग नाही. शिक्षण ही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “८ अठन्नी ४ चवन्नी, १२ पैसा अन् एक इकन्नी” एकूण किती रुपये होतील? आजोबांच्या या प्रश्नाचे तुमच्याकडे उत्तर आहे का? VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “बापाची नजर कमजोर पण तो लेकीला..”, १०२ वर्षांच्या शेतकरी बाबाला ‘गंगाआई’ भेटली, Video पाहून डोळ्यातून येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

satara_chhakdi_sharyat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “त्या बैलाला बाप म्हणून संभाळणार…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वया पेक्षा विचार लय मोठे आहेत आई बाप नक्की शेतकरी आहेत अशे संस्कार शेतकरी बापच करू शकतो” तर एका युजरने लिहिलेय, “वाह छोट्या काय विचार आहेत तुझे. आई बाबा बद्दल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुक्या जनावरांविषयी तुझे शब्द ऐकून अक्षरशः डोळे पाणावलेत खरंच” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय विचार आहे खरंच डोळ्यांत पाणी आणला भावा आणि हीच आपली संस्कृती आहे पण हे बोलून पण मनातले विचार समोर ठेऊन खूप मोठी चिंता दूर करत आहात. शेती केली तरच हे होऊ शकते” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.