Viral video: तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Fact Check Of Little Girl Trapped Under Rubble
ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा
Shocking Video madhya pradesh woman jumped from moving train after fighting with her husband
Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गोण्यांनी भरुन एक मोठा ट्रक उभा आहे. यावेळी या ट्रकमध्ये गोण्या भरण्याचे काम एक मजूर करत आहे. यासाठी ट्रकमधून खाली येण्यासाठी एक शीडी लावण्यात आली आहे, याच शिडीवरुन हा व्यक्ती पाठीवर गोण्या घेऊन खाली वर चढ उतर करत आहे. दरम्यान शेवटची गोणी ट्रकमध्ये ठेवण्यासाठी हा मजूर शिडीवर चढतो आणि अचानक ही शिडी तुटून जाते. त्यानंतर हा व्यक्ती गोणीसकट रस्त्यावर पडतो आणि तेवढ्यात रस्त्यावरुन आणखी एक ट्रक येतो. अगदी हाताच्या बोटाएवढ्या अंतरानं हा व्यक्ती ट्रकच्या धडकेपासून वाचतो. अवघ्या तीन सेंकदात हा व्यक्ती मृत्यूच्या दारात जाऊन परत आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> खतरनाक! पुणेरी पाटी सोडा “ही” कोकणी पाटी पाहा; कचरा टाकणाऱ्यांना दिली अशी धमकी की PHOTO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर vithu_mauli_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सावधगिरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”