राज्यभरात गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून, मनामनात आणि चराचरात गणपती बाप्पाचाच नामघोष सुरू आहे. घरोघरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं जात होतं. तर सार्वजनिक गणपतींचं दर्शन पाहण्यासाठीही भाविकांचे जत्थेच्या जत्थे उत्साहाने जमा होत होते. याच लाडक्या बाप्पाला आज भक्तांनी निरोप दिला. या निरोपाचा सोहळा पाहण्यासाठीही रस्तोरस्ती भरगच्च गर्दी जमलीय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन्ही बाजूंनी घर आणि मधल्या चिमुकल्या गल्लीतून एक भलीमोठी मुर्ती वाजत गाजत नेली जात आहे. गणपती बाप्पाचा हा थरारक व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या ठिकाणाहून गणपतीची मुर्ती आणली जातेय तो मार्ग अत्यंत निमुळता आहे. दोन्ही बाजूंना घरं आहेत. पण लक्षवेधी बाब म्हणजे मुर्तीकारानं या रस्त्याचा विचार करूनच अगदी योग्य मोजमापाची मुर्ती तयार केलीये. त्यामुळे हे गणपती बाप्पा अगदी सहजरित्या या चिमुकल्या गल्लीतूनही मंडपात जात आहेत. शिवाय भोवताली भक्तगण अगदी नाचत, जल्लोष करत बाप्पाचं स्वागत करतायेत.

या चिमुकल्या गल्लीतून निघते गणपत्ती बाप्पाची भव्य मिरवणूक पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणूनच जग यांना शिव्या घालतं”; पाकिस्तानात दोन नेते LIVE शोमध्ये भिडले; अक्षरश: लाथाबुक्क्यांनी तुडवलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा लाडका गणराया आज निरोप घेत आहे. देशभरात गणपती विसर्जन मिरवणुकांची जंगी तयारी आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. त्याआधी देशातील विविध भागात दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे वाजतगाजत विसर्जन केले. अलोट गर्दी आणि तरुणांच्या उत्साही वातावरणात या मिरवणुका पार पडल्या.