केरळमधील कोची शहरातील एका विचित्र घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे येथील एक तरुण बुरखा घालून महिलांच्या वॉशरूममध्ये घुसल्याचं उघडकीस आलं आहे. महिलांच्या वॉशरूममध्ये घुसलेला तरुण सुक्षिशित असून त्याने रोबोटिक्स सायन्समधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवाय तो वॉशरूममध्ये जाऊन महिलांचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीने वॉशरूममध्ये जाताना त्याचा मोबाईल बरोबर नेला होता. ही घटना कोचीच्या लुलू मॉलमध्ये घडली आहे.

मॉलच्या सुरक्षा अधिकार्‍यांच्या माहितीवरून कोची पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव अभिमन्यू असे असून तो रोबोटिक्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली केल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम ३५४ (सी) (कापून काढणे), आयपीसीच्या ४१९(तोतयागिरी) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ ई अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर या व्यक्तीने यापूर्वीही अशी कृत्य केली आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

हेही पाहा- Video: भंडारदऱ्यात १२ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट २० सेकंदात बुडाली; काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

वॉशरूममध्ये कॅमेरा लपवून व्हिडीओ शूट करत होता –

पोलिसांचे म्हणण्यानुसार, आरोपी बुरखा घालून महिलांच्या वॉशरूममध्ये घुसला, जिथे त्याने त्याचा फोन एका बॉक्समध्ये ठेवला. व्हिडिओ शूट करण्यासाठी त्याने फोन दरवाजाजवळ ठेवला होता. सुरक्षा रक्षकांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणाचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपीचा फोन आणि बुरखाही जप्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.