scorecardresearch

खाकी स्टूडियो रुकेगा नहीं! मुंबई पोलिसांचं ‘श्रीवल्ली’ व्हर्जन एकदा ऐकाच; Video Viral

मुंबई पोलिसांचा ‘श्रीवल्ली’ गाण्याचा हा व्हिडीओ मंत्रमुग्ध करणारा आहे.

व्हायरल व्हिडीओ (फोटो: Mumbai Police / YouTube)

महिना उलटून गेला, पण ‘पुष्पा’ काही झुकायचे नाव घेत नाही. अजूनही या चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर सामान्य लोक आणि सेलिब्रिटी इन्स्टाग्राम रीलमधून विविध प्रकारचे व्हिडीओ बनवत आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांच्या बँड खाकी स्टुडिओने ‘पुष्पा: द राइज’ मधील सुपरहिट श्रीवल्ली गाण रीक्रीयेट केल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच मनःशांती देईल. यामुळेच हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

खाकी स्टूडियो रुकेगा नहीं!

खाकी स्टुडिओचे सदस्य ‘श्रीवल्ली’ हे गाणं सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी आणि इतर वाद्यांसह वाजवताना आपण पाहू शकतो. हे ‘श्रीवल्ली’च व्हर्जन शेअर करत मुंबई पोलिसांनी लिहिले की ‘खाकी स्टूडियो रुकेगा नहीं!’ आम्ही मुंबईकरांना ‘श्रीवल्ली’च्या सुरावर डोलताना पाहिलं आणि त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला!

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. खाकी स्टुडिओने श्रीवल्ली असे कॅप्शन दिले होते. आतापर्यंत, क्लिपला ७००० हून अधिक दृश्ये, ७०० हून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. याआधी खाकी स्टुडिओने लता मंगेशकर यांच्या ‘ए मेरे वतन के लोगों’ आणि ‘मनी हाईस्ट’ या गाण्याचे ‘बेला चाओ’ गाणे सादर करून लोकांची मने जिंकली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khaki studio will not stop listen mumbai police srivalli version only once video viral ttg

ताज्या बातम्या