२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उदघाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला आहे. दरम्यान, रामाबद्दल आपले प्रेम आणि भक्ती दर्शवण्यासाठी अनेकांनी विविध कलाकृती सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यामध्ये काहींनी नृत्य करून दाखवले आहे तर काहींनी गायन, चित्रकला आणि तबला वादन इत्यादी करून आपली भक्ती दाखवली.

मात्र, सध्या ११ वर्षांच्या मुलाने सादर केलेली एक अतिशय वेगळी आणि प्रचंड अवघड अशी कला सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. व्हिडीओनुसार यामध्ये रुबिक्स क्यूबचा वापर करून प्रभू श्रीरामाची मोठी कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीतील शेवटचा रंगीत क्यूब लावण्याआधी त्या लहान मुलाने तो श्रीरामाच्या चरणी ठेऊन त्याला नमस्कार केला आणि आपल्या चित्रात लावल्याचे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो. रुबिक्स क्यूब म्हणजे रंगीत ठोकळ्याचा खेळ असतो. या ठोकळ्यातील रंगसंगतीचा वापर करून ‘हृदय पटेल’ नावाच्या मुलाने या अद्भुत कलेचे प्रदर्शन केलेले आहे.

हेही वाचा : Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…

हृदय पटेल हा हैद्राबादमधील सुचित्रा अकादमी शाळेत शिकत असल्याचे व्हिडीओखाली लिहिलेल्या कॅप्शनमधून समजते. हृदय पटेलने दाखवलेल्या या कलेला मोज़ेक कला [mosaic art] असे म्हणतात. यामध्ये विविध रंगाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी मिळून कलाकृती बनवली जाते. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @hriday_patel3112 या अकाउंटने शेअर केला आहे.

या सुंदर आणि अत्यंत अवघड अशा कलेवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा.

“बापरे, इतक्या लहान वयामध्येही इतकी सुंदर कलाकृती सादर केली आहे या मुलाने. खरंच प्रचंड सुंदर आहे हे. या मुलाच्या हातात जादू आहे”, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “खूपच सुंदर बाळा” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “खरंच जेव्हा कला आणि भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच अशी कलाकृती निर्माण होते” असे म्हटले आहे. तर अनेकांनी यावर ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आपल्याला पाहायला मिळते.

हेही वाचा : Viral Video : प्रभू श्रीरामाच्या भजनावर ‘Spiderman’ वाजवतोय तबला! व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

View this post on Instagram

A post shared by Hriday Patel (@hriday_patel3112)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर केवळ दोन दिवसांमध्ये ११८ प्रतिक्रिया आलेल्या आहेत.