भगवान हनुमान त्यांच्या शौर्य, शक्ती, प्रेम, करुणा, बुद्धिमत्ता आणि भक्तीसाठी ओळखले जातात. रामयणासह काही शास्त्रांमध्ये असा उल्लेख केला आहे की, “बजरंगबली हनुमान हवेत उडू शकत होते.” पण प्रत्यक्षात हे दृश्य कसे असेल याची झलक पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये मारुतीराया हवेत उडताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊ या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात हनुमंताची मुर्ती एका ड्रोनच्या मदतीने उडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी असे वाटत आहे की, “साक्षात भगवान हनुमान हवेत उडत आहेत.” हनुमंताची मुर्ती एका मोठ्या ड्रोनला बांधली आहे. या ड्रोनला सहा पंखे आहेत. ड्रोनला लावेलेल्या पंखाच्या मदतीने त्यांना ही मुर्ती हवेत उडत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर समजते की मुर्ती खूर मोठी आहे पण तरीही ड्रोनद्वारे सहज उडवली जाऊ शकते..

हवेत उडणाऱ्या मारुतीरायाला पाहून थक्क झाले लोक
व्हिडिओची सुरुवात हनुमंताची मुर्ती त्यांच्या उडणाऱ्या स्थितीत दिसत होती. मग कोणीतरी ड्रोन सुरू करतो आणि ते हळू हळू आकाशाकडे जाऊ लागते तसा लोकांची मोठी गर्दी जमा होऊ लाहते. काही लोक त्याचा व्हिडीओ बनवत आहेत तर काही जण त्यांच्या डोळ्यासमोर भगवान हनुमान कसे उडत आहेत हे पाहून थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. व्हिडिओमध्ये लोक भगवा झेंडा फडकवताना दिसत आहेत.

हेही वाचा – लखनऊचा ‘बर्म्युडा ट्रँगल’ माहितीये का? एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघाताचे व्हिडीओ शेअर करून ‘हा’ युट्युबर कमावतोय पैसे

हेही वाचा – “हा कसा रावण आहे, भाऊ!” बाईकवरुन केली एँट्री आणि स्टेजवर येताच नाचू लागला; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये हनुमान चालीसा देखील ऐकू येत आहे. हा व्हिडीओ एकूण २९ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये भगवान हनुमान आकाशात उडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रवी करकरा नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, भगवान हनुमान यांना ‘पवन पुत्र’ असेही म्हणतात. ट्विटमध्ये त्यांनी भगवान हनुमानाबद्दल अधिक माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord hanuman bajrangbali flying with drone viral video snk
First published on: 26-10-2023 at 20:43 IST