प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वे गाड्यांचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून वारंवार चर्चेत येत आहे. दरम्यान सध्याजोधपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या स्लीपर डब्याच्या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रवासी संपूर्ण चक्क शौचालयाजवळील जागेत झोपलेले दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी टॉयलेट आणि कपलरजवळ झोपलेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रवाशांची झलक दिसत आहे जे सर्व दरवाज्या जवळ झोपलेले आहेत. व्हिडिओ शेअर करताना @mumbaimatterz या X हँडलने लिहिले की, “#IndianRailways प्रवाशांसाठी “शून्य प्रतीक्षा यादीच्या दिशेने जात आहे. अहमदाबादहून आज पहाटे ३:५० वाजता निघालेल्या १२४७९ सूर्यनगरी “सुपर फास्ट” एक्स्प्रेसच्या “आरक्षित” कोचमधील हे दृश्य आहे.

व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, पश्चिम रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून काढून टाकल्याची माहिती दिली. “हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर, वडोदरा, सुरत आणि वापी स्थानकांवरील RPF कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना १२४७९ जोधपूर – मुंबई सूर्यनगरी एक्स्प्रेसच्या आरक्षित कोचमधून काढून टाकण्यात आले,” अशी पोस्ट पश्चिम रेल्वेने अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट केली.

हेही वाचा –“हाय गर्मी!”, कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर तरुणीने अंड्याचं बनवलं ऑम्लेट, Viral Video पाहून नेटकरी चक्रावले

“प्रवाशांच्या सोयीसाठी आणि या उन्हाळी हंगामात होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. याशिवाय, दररोज गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी डब्ल्यूआर कर्मचाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जात आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी या उन्हाळी विशेष गाड्यांच्या सुविधांचा लाभ घेण्याची विनंती करण्यात आली आहे,” असे पोस्टाने म्हटले आहे.

हेही वाचा – लॅपटॉपवर मिटिंग सुरु असताना दुकानात जाऊन शूज खरेदी करतेय महिला; फोटो व्हायरल, नेटकरी म्हणे,”यांच्यामुळे WFH…

ही पोस्ट 58,000 सोशल मीडिया वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने म्हटले की, “सर्वत्र समान… तक्रारीचा उपयोग नाही. “काही वेळ शौचालयातही जाता येत नाही.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अहमदबाद ते मुंबई या मार्गावर खूप गर्दी असते आणि ट्रेनमध्ये स्लीपर कोच कमी असतात म्हणून तुम्हाला रोजच्या रोज अहमदाबाद ते मुंबईपर्यंतच्या सर्व ट्रेनमध्ये जवळपास असेच चित्र दिसेल!”

एप्रिलमध्ये, गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये टॉयलेटमध्ये पोहोचण्यासाठी एक माणूस ‘स्पायडर-मॅन’ बनत असल्याच्या व्हिडिओची इंटरनेटवर तुफान चर्चा झाली होती.