अनेक बेशिस्त चालक वाहतूकीचे नियम मोडत असतात त्यामुळे त्यांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलिस वाहतूकीचे नियम मोडल्याबद्दल दंड आकारते. बाईक चालवताना हेल्मेट न वापरल्यास दंड आकरला जातो हे तुम्हाला माहित असेल पण कार चालवताना हेल्मेट न वापरल्यास दंड आकरल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? बरं साधी सुधी कार नव्हे तर चक्क ऑडी कार. एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, ऑडी कार चालवताना हेल्मेट न वापरल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी त्याला १००० रुपये दंड ठोठवला आहे.

स्थानिक ट्रकर्स युनियनचे प्रमुख असलेले बहादूर सिंग परिहार यांना शहर वाहतूक पोलिसांकडून दंडाची माहिती देणारा मेसेज मिळाला. परिवहन वेबसाइट तपासल्यावर, त्याला असे आढळले की, “तो हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना पकडला गेला होता. मात्र त्यावेळी तो त्याची ऑडी कार चालवत होता.”

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, दंडामध्ये दुचाकीच्या फोटोचा समावेश आहे. वाहनाचा प्रकार मात्र ‘मोटार कार’ म्हणून सूचीबद्ध होता. ही परिस्थिती अफलातून गोंधळात टाकणारी आहे. परिहार यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला. लोकसभा निवडणुकीनंतर या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले.

हेही वाचा- लॅपटॉपवर मिटिंग सुरु असताना दुकानात जाऊन शूज खरेदी करतेय महिला; फोटो व्हायरल, नेटकरी म्हणे,”यांच्यामुळे WFH…”

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये परिहार यांना हिंदीत असे म्हणताना ऐकू येते की, “हेल्मेटशिवाय माझी कार चालवल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी मला दंड ठोठवला आहे. मला माझी कार चालवताना मला हेल्मेट परिधान करावे लागत आहे. त्यांनी जर मला पुन्हा दंड ठोठावला तर?

हेही वाचा – “हाय गर्मी!”, कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर तरुणीने अंड्याचं बनवलं ऑम्लेट, Viral Video पाहून नेटकरी चक्रावले

या व्हिडिओला चार दिवसांत १४,००० व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने म्हटले, “F1 ड्रायव्हर देखील हेल्मेट घालतात.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “एखाद्याला हे माहित असले पाहिजे की जर तुमच्या वाहनावर चुकीचे चलन जारी केले गेले असेल, तर तुम्ही ऑनलाइन रिपोर्ट पर्यायाद्वारे चलन जारी केलेल्या संबंधित पोलिस स्टेशनला त्रुटीची तक्रार करू शकता. योग्य पडताळणीनंतर जर त्यांना चलन चुकून दिलेले आढळले तर ते ते रद्द करतील आणि त्या व्यक्तीला एकही रुपया देण्याची गरज नाही. तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “युपी मध्ये काहीही घडू शकते.” आणखी एका युजरने म्हटले, “भाऊ म्हणूनच सावध राहा आणि सतर्क राहा.. यूपीमध्ये काहीही होऊ शकते…”