जत्रेत आपल्याला अनेक कसरतीचे खेळ पाहायला मिळतात. कधी दोरीवर चालणारी लहान मुलं तर कधी अनेक गोष्टी हवेत फेकून त्या हाताने बॅलेन्स करताना दिसणारे तरुण. भारतातील ही कसरतीची कला फार पूर्वी पासून जपली जातेय. कसरती करणाऱ्यांचे कौशल्य खूप वाखाडण्याजोगे असते. त्यांची तुलना इतरांशी करणे अशक्य आहे, कारण ही कला सादर करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.सध्या असाच एक कसरतीचा खेळ दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण आपल्या एक अवघड स्टंट करताना दिसत आहे. त्याची कला इतर लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे कारण तो डोक्यावर अनेक गोष्टी एकाच वेळी बॅलेन्स करताना दिसत आहे.
@praveen_prajapat1 नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा युजर स्वत: असे अनेक स्टंट करत असतो. इंडियाज गॉट टॅलेंटमध्येही तो सहभागी झाला होता. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी आता व्हायरल होणारा व्हिडीओ युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये तो एका जत्रेत उभा असून सर्वांसमोर स्टंट करताना दिसत आहे. डोक्यावर एकाच वेळी अनेक गोष्टींचा तोल सांभाळत तो उभा आहे, तो करत असलेला प्रकार इतका अवघड आहेत की सामान्य माणूस हे करण्याचा विचारही करू शकत नाही.
तरुणाची अप्रतिम कला
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका तरुणाने डोक्यावर एकावर एक काचेचे ४ ग्लास ठेवले आहेत. त्या ग्लासवर एक मोठा सिलिंडर ठेवला आहे आणि नंतर त्यावर दोन स्टीलचे मोठे हंडे ठेवले आहेत. इतक्या वस्तू डोक्यावर ठेवूनही त्याचे दोन्ही हात खाली आहेत. कोणत्याही आधाराशिवाय त्याने सर्व गोष्टी डोक्यावर ठेवल्या आहेत. यावेळी आजूबाजूला उभे असलेले लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. यावेळी एक महिला उत्सुकतेपोटी त्याचा हा व्हिडिओ शूट करत आहे.
या व्हिडिओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, हे टॅलेंट त्याला देवाने दिलेली नाही, ते शिकण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. तर दुसऱ्या एकाने म्हटले की, काकूंनी त्यांच्या फोनवरून बनवलेला व्हिडिओ त्यांनी आपल्या फोनवरूनही अपलोड करावा. अनेकजण तरूणाला त्यांच्या शहरात येऊन असा परफॉर्म करण्यास सांगत आहेत.