scorecardresearch

हायवेवरच्या फलकाला लटकून केली Exercise; Viral Video पाहून नेटकरी झाले हैराण

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अशा धोकादायक ठिकाणी लटकून व्यायाम करताना दिसत आहे, जे पाहून लोकांच्या अंगावर काटा आला आहे.

viral video
royalcarsz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

जर तुम्ही रोज व्यायाम केलात तर तुम्हाला त्याच्या फायद्यांबद्दल बरेच काही कळेल. व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. काही लोक रोज व्यायाम करतात, तर काही लोक व्यायाम करण्यात खूप आळशी असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला व्यायामाची आवड असणारे लोकही पाहिले असतील, जे त्यांच्या शरीराला खूप जपतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अशा धोकादायक ठिकाणी लटकून व्यायाम करताना दिसत आहे, ज्याला पाहून लोकांच्या अंगावर काटा आला आहे. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक डोंगराच्या माथ्यावर, धोकादायक ठिकाणी व्यायाम करताना दिसतात, परंतु यामध्ये दिसणारी व्यक्ती अशा ठिकाणी लटकून व्यायाम करत आहे, जिथून जर तो पडला तर त्याचे हात-पाय तुटू शकतात.

अजय देवगण स्टाइलने स्टंट करणे पडले महागात; पोलिसांनी अशी घडवली अद्दल

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा माणूस हायवेवर दिशा आणि अंतर दाखवणाऱ्या बोर्डला लटकून कसरत करत होता. हा फलक खूप उंचीवर लावलेला दिसतो. या फलकावर ती व्यक्ती कशी आली हे सध्या तरी कळू शकलेले नाही. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की या व्यक्तीने त्या फलकाचे लोखंडी रॉड पकडले आहेत आणि त्यांच्या मदतीने तो व्यायाम करत आहे. हे सर्व करताना त्या व्यक्तीला किंचितही भीती वाटत नाही.

या चिमुकलीचा व्हिडीओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ; Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, “ही तर बॉर्न डान्सर”

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

royalcarsz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. हा व्हिडीओ पाहून एका यूजरने कमेंट लिहिली, ‘याला दुसरी जागा सापडली नाही का? इथून जर हा पडला, तर त्याचे हात पाय तुटतील.’ बहुतेक लोक त्या व्यक्तीला मूर्ख म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man finds this place to exercise netizens got annoyed after watching the viral video pvp

ताज्या बातम्या