Python Shocking Video : मद्याच्या नशेत लोक कधी काय करतीय याचा काही नेम नाही. अनेकदा नशेबाज लोकांना आपण काय करतोय याचेदेखील भान नसते. अशावेळी ते असे काही वागतात, ज्यामुळे ते स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. नशेच्या धुंदीत माणसाचं डोकं नीट काम करत नाही, आपण करतोय ते योग्य की अयोग्य? हेच लोकांना कळत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मद्यधुंद व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका भयानक आहे की, पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल.

नेमकं घडलं काय? (Python viral video)

भररस्त्यावर दारूच्या नशेत एक व्यक्ती चक्क मानेवर अजगराला घेऊन फिरत होती. या व्यक्तीने इतकी दारू प्यायली होती की, त्यालाच समजत नव्हतो की तो स्वत:बरोबर हातात एक मृत्यूचा सापळा घेऊन फिरतोय.

…अन् अजगराला तरुणाने रस्त्यात गरकन फिरवला (Drunken Man Lifted a Giant Python)

फिरता फिरता ही मद्यधूंद व्यक्ती हातात अजगराचे तोंड पकडून रस्त्यावर फिरते, यानंतर काहीवेळीने तो अजगराला गळ्यात टाकून चालत थोडं पुढे जातो. नंतर त्याची शेपटी पकडतो आणि रस्त्याभर फरफटत घेऊन जातो. हातात एखादी दोर पकडल्याप्रमाणे त्याने अजगराला पकडून ठेवलेले असते. या माणसाला कशाचीच जाणीव नव्हती. त्याने इतकी दारू प्यायली होती की त्याला नीट चालताही येत नव्हतं. भीती नावाचा प्रकार या व्यक्तीमध्ये अजिबात दिसत नव्हता.

More Trending News Read Here : “ही मुंबईचं नाव खराब करतेय”, रेल्वेस्थानकावरील तरुणीचा विचित्र डान्स VIDEO पाहून युजर्सचा संताप; म्हणाले, “वेडेपणा…”

अजगराला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी (Python Video Viral)

तरुणाचा अजगराबरोबरचा हा जीवघेणा खेळ पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक जण मोबाइलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड करत होते, तर अनेक जण अजगराला बघून दूर पळत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यावर अनेकांनी भन्नाट कमेंट्सदेखील केल्या आहेत. काहींनी ही दारूच्या नशेची कमाल आहे, अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत; तर अनेकांनी त्या अजगराला सुरक्षित जंगलात सोडण्याची मागणी केली आहे.