Man Mixes Semen In Ice Cream Viral Video : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेककोंडा मंडलमध्ये रस्त्याच्या कडेला कुल्फी आणि आइस्क्रीम स्टॉल चालवणाऱ्या एका व्यक्तीचं भयानक कृत्य कॅमेरात कैद झालं आहे. सदर विक्रेता हा स्टॉलच्या शेजारी हस्तमैथुन करून आईस्क्रीम व फालुदाच्या भांड्यात वीर्य टाकताना दिसत आहे. आंबेडकर सेंटरमध्ये ‘भैरुनाथ आईस्क्रीम कुल्फी’ नावाचा आईस्क्रीम स्टॉलवरील सेन्सॉर केलेले फुटेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. साहजिकच या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे पण त्याही पेक्षा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे, “काय गरज होती”?
व्हायरल व्हिडिओनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आइस्क्रीमच्या या स्टॉलवर धाड टाकून सदर विक्रेत्याला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी चालू असून तपास पूर्ण होईपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नेककोंडा पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून दिलेल्या माहितीनुसार, हा आईस्क्रीम विक्रेता मूळचा राजस्थानचा असून याचे नाव काळुराम कुरबिया असे आहे. त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी आयपीसी कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी संताप व्यक्त केल्या आहेत. या व्यक्तीला कठोर शिक्षा द्याच पण त्याआधी त्याने असं का केलंय हे शोधून काढा. एकाने यावरून काही वर्षांपूर्वी घडलेली पाणीपुरीच्या स्टॉलवरील घटना आठवल्याचे सांगत म्हटले की, “काही वर्षांपूर्वी एका पाणीपुरी विक्रेत्याने पाण्यात लघवी मिसळली होती. माझा त्यावर कधीच विश्वास बसला नाही पण आता हे असं काही प्रत्यक्ष बघून माझ्याकडे शब्दच नाहीत.”
हे ही वाचा >> ममता बॅनर्जींच्या जखमी फोटोनंतर व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोची भलतीच कहाणी उघड; त्या सभेची खरी बाजू पाहा
दरम्यान अशा प्रकारची किळसवाणी घटना ही सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच घडली असली तरी हा प्रकार यापूर्वीही चर्चेत आला होता. जेव्हा तीन मिशेलिन स्टार्स मिळवलेल्या स्पॅनिश शेफ डेव्हिड मुनोझने त्याच्या मेनूमध्ये माशांच्या वीर्याचे मिश्रण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जपानी शेफ हिरो सातो यांनी माशांच्या वीर्यापासून बनवलेली पांढरी पेस्ट शिराको चाखल्यावर या शेफला ही प्रेरणा मिळाली होती.