scorecardresearch

मगरीसोबत पंगा नाही! पठ्ठ्याने जीवंत मगरीच्या जबड्यात हात टाकला, काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं, थरारक Video Viral

मगरीच्या जबड्यात हात टाकून खेळ करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली, थरारक व्हिडीओ व्हायरल…

मगरीसोबत पंगा नाही! पठ्ठ्याने जीवंत मगरीच्या जबड्यात हात टाकला, काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं, थरारक Video Viral
मगरीच्या जबड्यात एका तरुणाने हात टाकला. (image-Instagram)

सोशल मीडियावर प्राण्यांसोबत मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे अनेक मेजशीर व्हीडओ आपण पाहतो. पण एका पठ्ठ्याने पाळीव प्राणी नाही तर थेट जीवंत मगरीच्या जबड्यात हात टाकून खेळण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल करुन प्रकाशझोतात येण्यासाठी काही जण लाख मोलाच्या जीवाला कवडीमोल करताना दिसतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने मगरीच्या जबड्यात हात टाकल्यानंतर काही सेकंदाच मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीसोबत खेळ करणं या तरुणाच्या अंगटल आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

….म्हणून मगरीने तरुणाच्या हातावर हल्ला केला

वन्य प्राणी, साप, मगर यांच्यासोबत अनेक जण मस्ती करायला जातात आणि त्या प्राण्यांचे शिकार होतात. एका तरुणानेही मगरीसोबत पंगा घेतला आणि होत्याचं नव्हतं झालं. एका स्टेजवर दोन मगरी शांतपणे बसलेल्या या व्हिडीओत दिसत आहेत. पण एक तरुण एका मगरीच्या जबड्यात हात टाकण्याची हिंमत करतो आणि काही क्षणातच मगर त्याच्यावर हल्ला करते. मगरीच्या हल्ल्यात त्या तरुणाच्या हाताला मोठी जखम झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. नदीकिनारी राहणाऱ्या मगरींना घेऊन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काही तरुण त्यांच्या खेळ करतात. पण असे जीवघेणे खेळ अशा तरुणांच्या अंगलट आल्याचं अनेकदा व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे.

इथे पाहा व्हिडीओ

earth.reel नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मगरीसोबत खेळ करण्याचा असाच एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक व्यक्ती मगरीच्या वेशात जीवंत मगरीजवळ जातो आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या मगरीला आपल्याजवळ कुणीतरी आलं आहे, असा अंदाज आल्यावर त्या तरुणाची पळता भुई होते. काही तरुणांना मगरीसोबत खेळ करण्याचं वेड वाढत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येत आहे. मगरीसोबत मस्ती करणं जीवावर बेतू शकतं, असं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 13:49 IST

संबंधित बातम्या