विज्ञान अन् तंत्रज्ञानामुळे आजकाल कोणतेही काम करणे सहज शक्य झाले आहे. कोणतीही गोष्ट मोबाईलद्वारे सहज मागवता येते तेही घरपोच. विशेष म्हणजे कपड्यांपासून खाद्यपदार्थ, किराणा, औषधे….कोणतीही वस्तू आजकाल घरपोहच मिळते. पण अनेकदा ग्राहकांना या सुविधेचा वाईट अनुभव येतो. कधी शाकाहारी जेवणाऐवजी मासंहारी जेवण दिले जाते, कधी खाद्यपदार्थांमध्ये झुरळ, किंवा अळी सापडल्याचे आढळते. असे प्रकार अनेकदा योग्य समन्वय नसल्यामुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे होतात. निष्काळजीपणामुळे अनेकदा एस्पायरी डेट संपलेले पदार्थ ग्राहकांना दिले जातात ज्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहक संबधीत हॉटेल किंवा सुविधा देणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून तक्रार करतात तर अनेकदा अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात जेणेकरून इतरांबरोबर असे कधीही घडू नये. अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे.

कंटेंट क्रिएटर चाऊ सुरेंग राजकोंवर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ब्लिंकिट या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर हजारो व्ह्यूज मिळालेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी अॅपद्वारे अंडी मागवले होते पण त्यांना कुजलेल्या अंड्यांचा ट्रे मिळाल्याचा खुलासा केला आहे.

व्हिडिओमध्ये तो अंडी फोडताना दिसतो, पण त्याला ती रंगहीन झालेली दिसतात आणि त्यातून दुर्गंधी येते. त्यानंतर तो आणखी अंडी फोडतो त्यातून काळे द्रव बाहेर पडताना दिसत आहे. हे बघ! अंड्यातून हे काळ्या रंगाचे द्रव कसे बाहेर पडत आहे?.” असे म्हणतो.

राजकंवर यांनी पुढे स्पष्ट केले की, ऑर्डर मिळताच त्यांना संशय आला कारण त्यातून तीव्र दुर्गंधी येत होती, ज्यामुळे त्यांना अंडी तपासावी लागली. व्हिडिओ शेअर करताना त्याने “ब्लिंकइटकडून कुजलेली अंडी मिळाली,” असे कॅप्शन लिहिले होते. कंपनीने अद्याप व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओसोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांना Blinkitकडून असाच अनुभव आल्याचे सांगितले आहे. एकाने सांगितले की, मलाही Blinkit, Zepto आणि Instamart असाच अनुभव आला होता. आता मी स्थानिक बाजारातूनच खरेदी करतो. देव जाणे मी काय खात होतो.”

दुसरा म्हणाला की, “होय, मलाही असाच अनुभव आला होता. मी ३० अंड्याचा ट्रे मागवला पण त्यातील फक्त १० अंडी चांगली निघाली. का माहित नाही.”

तिसरा म्हणाला की, मला ही Blinkitचा असाच अनुभव नुकताच आला होता. मला कुजलेले खजूर दिले होते आणि त्यांनी रिफंड देखील दिला नाही. यापुढे मी खरेदी करताना दोनदा विचार करेन.

चौथा म्हणाला, नेहमी स्थानिक दुकानामधून किराणा सामान खरेदी करा कारण ते सातत्याने विकले जात असतात ज्यामुळे तसेच खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला एक्स्पायरी डेट संपली आहे का ते पाहता येते.

व्हिडीओवर एकाने @letsblinkit @blinkitstores ला टॅग करत विचारले, आता उत्तर देणार नाही का, लाज वाटते का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्चमध्ये, एका ग्राहकाने ब्लिंकिटवर अॅपवर जाहिरात केलेल्यापेक्षा कमी वजनाची उत्पादने देऊन ग्राहकांना फसवत असल्याचा आरोप केला. ग्राहकाने रेडिटवर त्यांचा अनुभव शेअर केला आणि दावा केला की,”त्यांना मिळालेल्या द्राक्षांच्या पॅकेटचे वजन ब्लिंकिट वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या ५०० ग्रॅमच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होते. “