जेव्हा एखादी गोष्ट काम करत नाही तेव्हा जुगाड कामी येतो आणि भारतात अशा जुगाडू लोकांची कमी नाही. अगदी कचऱ्यातूनही अनेकजण काहीतरी भन्नाट गोष्टी बनवत असतात. अशावेळी त्यांनी जुगाड करुन बनवलेल्या गोष्टी पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. अशाच एका नव्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातील व्यक्तीचे टॅलेंट पाहून तुम्हालाही आश्चर्यचकित व्हायला होईल. यात एका काकांनी झोपण्यासाठी चक्क ट्रकखाली एक अलिशान बेड बनवला आहे, जो पाहिल्यानंतर आपलचं काय इंजिनिअर्सचं डोक गरगरेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रकच्या खाली झोपण्यासाठी जुगाड करुन एका काकांनी आरामदायी बेड बनवला आहे आणि त्यावर ते अगदी शांतपणे झोपलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भरधाव वेगाने हा ट्रक रस्त्यावर धावतोय, तरीही त्याखाली बनवलेल्या बेडवर काका अगदी आरामात झोपून आहेत. काकांनी झोपण्यासाठी अशी व्यवस्था केली आहे की, ज्याचा कधी कोणी विचारही केला नसेल. जुगाड करुन बनवलेला हा बेड जरी आलिशान दिसत असला तरी त्यावर झोपणे कोणत्याही धोक्यापेक्षा कमी नाही. कारण ट्रक चालकाकडून एक छोटीशी चूक जरी झाली तर ती त्यांच्यासाठी जीवघेणी ठरु शकते. यात बेडवर झोपणारा व्यक्ती जर लोळणारा असेल तर ब्रह्मदेवसुद्धा त्याला मरण्यापासून वाचवू शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुष्य इतकं टेन्शन फ्री असायला हवं

हा व्हिडिओ (indian_ka_talent) नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भारतात कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक राहतात. हा व्हिडीओ आत्तापर्यंत ७ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, काकांचा हा एकदम तगडा जुगाड आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, भावा मला माझ्या आयुष्यात इतके तणावमुक्त व्हायचे आहे. तर अनेकांनी लिहिले की, आयुष्यात एवढी रिस्क कोण घेतं?