Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. काही इल्यूजन इतके कठीण असतात का सोडविणे अवघड असते.काही इल्यूजन दिसायला सोपी वाटत असले तरी सोडविणे जिकरीचे असते.
सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका वाचनालयातील आहे पण तुम्हाला या फोटोमध्ये एक चेहरा लपलाय. आपल्याला कुणाचा चेहरा लपलाय, हे शोधून काढायचं आहे.
या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये आपल्या एक वाचनालय दिसत आहे. या वाचनालयात पुस्तकांच्या अनेक अलमारी दिसत आहे. व्हिडीओत एक टेबल सुद्धा दिसत आहे. त्यावर दोन तीन पुस्तके ठेवलेली दिसत आहे पण व्हिडीओत कुणाचाही चेहरा दिसत नाही.
या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “डोळे ७५ टक्के बंद करा आणि सांगा पाहू काय दिसतेय”
हेही वाचा : VIDEO : सीताफळाच्या बिया सोप्या पद्धतीने कशा काढाव्यात? पाहा सोपी ट्रिक, व्हिडीओ होतोय व्हायरल
फोटोमध्ये कुणाचा चेहरा लपलाय?
सुरुवातीला या फोटोमध्ये तुम्हाला पुस्तकांशिवाय काहीही दिसणार नाही पण जेव्हा नीट लक्ष देऊन पाहाल तर तुम्हाला कदाचित चेहरा दिसू शकतो. फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे डोळे ७५ टक्के बंद करा तुम्हाला एक ओळखीचा चेहरा दिसू शकतो.
गौतम बुद्धांचा चेहरा दिसतोय का?
फोटोच्याच्या कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण डोळे ७५ टक्के बंद करुन फोटोकडे पाहू तेव्हा आपल्याला गौतम बुद्धांचा चेहरा दिसेल. खरच हा फोटो थक्क करणारा आहे.
या फोटवर अनेक युजर्सनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी गौतम बुद्ध दिसत असल्याचे कमेंट्समध्ये सांगितले आहे.