Viral Video : नदी, तलावात लोक बुडाली, अशा घटनांविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. कधी समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला, याविषयी सुद्धा तुम्ही ऐकले असतील. त्यासाठी वारंवार प्रशासनाकडून आपल्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो पण तरीसुद्धा लोक ऐकत नाही पण आज आम्ही तुम्हाला सांगितले की आता कोणीही पाण्यात बुडणार नाही तर तुमचा विश्वास बसणार नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक रिमोटवर नियंत्रित करणारं यंत्र तयार करण्यात आलं आहे. या यंत्राच्या मदतीने आपण नदी, तलावात बुडणाऱ्या किंवा समुद्राच्या लाटेत वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवू शकतो. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Remote Operated Device Saves Live and Prevents from Drowning people)

रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक समुद्र किनारा दिसेल. या व्हिडीओत तुम्हाला एक व्यक्ती समुद्राच्या लाटेत बुडताना दिसेल पण तितक्यात समुद्र किनाऱ्यावरील एक जण समुद्राच्या लाटांकडे एक यंत्र फेकतो आणि दुसरा त्या यंत्राला रिमोटद्वारे नियंत्रित करतोय. रिमोट नियंत्रिक करणारा हे यंत्र रिमोटच्या मदतीने समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीजवळ घेऊन जातो. त्यानंतर बुडणारी व्यक्ती त्या यंत्राला पकडते आणि रिमोटच्याच मदतीने यंत्रासह त्या व्यक्तीला किनाऱ्यापर्यंत आणले जाते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आता कोणीही बुडणार नाही.”

Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Preeti Makhija Death in Accident
Preeti Makhija : केशर पान मसाला कंपनी मालकाच्या पत्नीचा अपघातात मृत्यू, आग्रा एक्स्प्रेस वे वरची घटना
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”

हेही वाचा : खतरनाक धुलाई! बंदुकीचा धाक दाखवून करू लागले बाईक चोरी, पण काही मिनिटांत उलटलं चित्र; पाहा थरारक घटनेचा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “आमचं लग्न होईना, मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना” डीजेवर वाजलं भन्नाट गाणं; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

goa_darling या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करणयात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रिमोटवाला लाइफ गार्ड जाणार आणि बुडणाऱ्याला वाचवून आणणार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान पण यावर आणखी संशोधन करणे गरजेचे आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात तंत्रज्ञानाचा योग्य वापर” अनेक युजर्सना हे यंत्र आवडले असून त्यांनी यंत्र तयार करणाऱ्याचे कौतुक केले आहेत.