बघता बघता २०२४ वर्ष संपल अन् २०२५ सुरु झालं. नवीन वर्ष म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी, पुन्हा नव्या जोमाने आणि उर्जेने पुढे जाण्याची संधी असते. नव्या वर्षाच्या स्वागत सर्वजण उत्साहाने करतात, कोणी पार्टी करतात, कोणी मित्र-परिवारासह फिरायला जातात. पण पुणेकरांच्या नववर्षाची सुरुवात मात्र लाडक्या बाप्पाच्या आशिर्वादानेच होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी मोठ्या संख्येने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. दरम्यान लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची भली मोठी रांग लागली होती. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती हे सर्वांनाचा माहित आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी १२ महिने गर्दी असते. अनेक भाविक लांबून लांबून बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. कोणतेही मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी पुणेकर दगडूशेठ गणपती मंदिराला आवर्जून भेट देतात मग नव्या वर्षाच्या सुरुवातीला लाडक्या बाप्पााला पुणेकर कसे काय विसरतील. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक पुणेकरांनी बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी दगडूशेठ गणपती मंदिराला आवर्जून भेट दिली. काहींनी रस्त्यावरून बाप्पाचे मुखदर्शन केले तर काहींना तासन् तास रांगे उभे राहून लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले.

हेही वाचा –“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, बेशिस्त दुचाकी चालकाला सायकल घेऊन भिडले पुणेरी काका, Viral Video बघाच…

सोशल मीडियावर दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर भक्तांची गर्दी आणि भली मोठी रांग लागल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेक पुणेकरांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा –रीलसाठी तरुणाने रेल्वेच्या डब्यातील सीट कव्हर फाडले अन् चालत्या ट्रेनच्या खिडकीतून…Viral Video पाहून भडकले नेटकरी

View this post on Instagram

A post shared by Akshay Waykar (@akshaywaykar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाने कमेंट केली की,”बाप्पा किती छान दिसतोय”
दुसऱ्याने कमेंट केली की, १ जानेवारीला सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद.
तिसऱ्याने कमेंट केली की, “आज १ जानेवारी आणि नवीन वर्षाची पहिली सुरुवात आम्ही पुणेकर बाप्पाचे दर्शन घेऊन करतो”