scorecardresearch

राजू श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या रोहन जोशीने मागितली माफी; म्हणाला, “थोडा विचार…”

जोरदार टीकेनंतर रोहन जोशीने आपली आक्षेपार्ह्य कमेंट हटवली असून त्याने जाहीर माफी मागितली आहे.

राजू श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या रोहन जोशीने मागितली माफी; म्हणाला, “थोडा विचार…”
जोरदार टीकेनंतर रोहन जोशीने आपली आक्षेपार्ह्य कमेंट हटवली असून त्याने जाहीर माफी मागितली आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत निधन झाले. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या दीड महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार, अभिनेते, राजकारणी आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी शोक व्यक्त केला. तसेच, अनेकांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली.

कॉमेडियन अतुल खत्री यांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर राजू यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी लिहलं, “RIP राजूभाई ❤️? तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही स्टेजवर गेलात तेव्हा तुम्ही सर्वांना हसवलं. तुमची उपस्थिती अशी होती की जेव्हा लोक तुम्हाला पाहायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटायचे. तुमची खरोखरच आठवण येईल. तुमचे जाणे हे भारतीय स्टँड-अप कॉमेडीचे मोठे नुकसान आहे.”

मात्र या पोस्टवर रोहन जोशीने अत्यंत कठोर शब्दात राजू श्रीवास्तव यांच्यावर निशाणा साधला होता. रोहन आपल्या पोस्टमध्ये राजू श्रीवास्तव यांच्याविरुद्ध बरंच काही बोलला. पण यानंतर नेटकऱ्यांनीही त्याला धारेवर धरत जोरदार ट्रोल केलं. या टीकेनंतर रोहन जोशीची आक्षेपार्ह्य कमेंट अतुल खत्री यांच्या पोस्टवरून हटवण्यात आली.

ही आघाडीची कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय ११ दिवसांचा ब्रेक; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

यानंतर रोहनने आपल्या पोस्टबद्दल माफी मागितली आहे. त्याने लिहलंय, “एका मिनिटाच्या रागानंतर, ‘आजचा दिवस माझ्या वैयक्तिक भावनांचा नाही’, हाच विचार करून पोस्ट डिलीट केली आहे. माझ्यामुळे कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व आणि या दृष्टिकोनासाठी धन्यवाद.”

rohan joshi on raju shivastava
Instagram

आत्मनिर्भर पुणेकर तरुणी श्रीमंतांच्या यादीत! एकूण संपत्ती आहे १३ हजार ३८० कोटी

रोहन जोशीच्या त्या कमेंटमुळे अभिनेता सिकंदर खेर देखील नाराज झाला होता. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “असेही काही लोक असतात, जे आपण विचार करतो त्याप्रमाणे आदर्शवादी जीवन जगत नाहीत. पण, हे जीवन आहे आणि माझ्यामते, आपल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आपण माणूस म्हणून मानवतेच्या साहाय्याने त्याचा सामना केला पाहिजे. मात्र, अकाली मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल हे वाचल्यानंतर, हे लिहणाऱ्या, स्वतःला विनोदी समजणाऱ्या व्यक्तीमध्ये माणुसकीचा अभाव आहे, हे पाहून मला वाईट वाटले.”

rohan joshi on raju shivastava
Instagram

रोहन जोशीने आपल्या कमेंटमध्ये काय म्हटलं होतं?

rohan joshi on raju shivastava
Instagram

“आम्ही काहीही गमावलेले नाही. (कुणाल) कामराचा रोस्ट असो किंवा इतर कॉमिक राजू श्रीवास्तव यांनी नवीन चेहऱ्यांवर नेहमीच टीका केली. विशेषत: स्टँड अपची नवीन पिढी समोर येत असताना त्यांनी एकही संधी सोडली नाही. तो प्रत्येक न्यूज चॅनेलवर गेला आणि प्रत्येकवेळी नव्या कलाकारांना आक्षेपार्ह म्हणून टीका करून आला. त्याने कधीतरी चार चांगले जोक सांगितले असतील पण त्याला कॉमेडीची समज नाही आणि आपण सहमत नसताना इतरांचे मत कसे दाबून टाकू नये हे ही कळत नाही, बरं झालं आम्ही सुटलो.” अशा शब्दात रोहनने कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohan joshi apologizes for controversial post after raju srivastava death pvp