Rohit Sharma Wicket: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. वर्ल्ड कप २०२३ च्या फायलनचा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तुफानी फलंदाजी केली. मात्र, तो थोडा लवकर बाद झाला आणि ४७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याची पत्नी रितिका सजदेह आणि अनुष्का शर्मा खूपच निराश दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. पण रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकला आणि ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट झेल घेत रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

रोहित शर्मा बाद होताच ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल खूप सेलिब्रेशन करताना दिसला. यानंतर मैदानावर उपस्थित असलेली रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही खूप निराश दिसली आणि रितिकाला ग्लेन मॅक्सवेलचे सेलिब्रेशन आवडले नाही असे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ३० चेंडूत ४७ धावांची खेळी खेळून बाद झाला. रोहित शर्माने आपल्या स्फोटक खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. तर अर्धशतकानंतर किंग कोहली क्लीन बोल्ड झाला. वृत्त लिहिण्यापर्यंत केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव क्रीझवर फलंदाजी करत आहेत.