मेंढी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. हा पाळीव प्राणी असतो, जो लोकरासोबतच दूध आणि मांस विक्रीसाठी पाळला जातो. मेंढीदेखील गाई आणि म्हशीप्रमाणेच शांत स्वाभावाची असते, असं म्हटलं जातं. मात्र काही वेळा तिचं रौद्ररूपही पाहायला मिळतं आणि अशावेळी ती समोरच्यावर हल्ला करायलाही मागे-पुढे पाहात नाही. सोशल मीडियावर सध्या मेंढ्यांच्या अशाच एका विचित्र प्रकरणाची चर्चा सुरूय. एक मेंढा कुणाचा जीव घेऊ शकते, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशीच एक विचित्र घटना घडलीय. एका मेंढ्याला महिलेच्या हत्याप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला विचित्र वाटेल कदाचित. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

हे विचित्र प्रकरण आफ्रिकामधलं आहे. सुदानच्या आय रेडिओनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण सुदानमध्ये ४५ वर्षीय एडीयू चॅपिंगवर हल्ला केल्यानंतर या मेंढ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मेंढ्याने एडीयू चॅपिंग हिच्या डोक्यावर वारंवार वार करून तिच्या फासळ्या तोडल्या होत्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल पंपावर गाडी थांबवण्याची चूक पडली महागात, डोळ्यादेखत चोरट्यांनी गाडी पळवून नेली

त्यानंतर पोलिसांनी ही घटना रुंबेक पूर्वेला अकुएल योल नावाच्या ठिकाणी घडल्याची माहिती दिली होती. मेंढ्याला पकडून मालेंग अगोक पायम येथील पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. मीडिया आउटलेटशी बोलताना, मेजर एलिजाह माबोर यांनी सांगितले केले, “मालक निर्दोष आहे आणि मेंढा हा गुन्हेगार आहे म्हणून तो अटक करण्यास पात्र आहे, नंतर हे प्रकरण कस्टमरी कोर्टमध्ये पाठवले जाईल .”

आता स्थानिक मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देऊन, लॅडबिबलने दिलेल्या वृत्तानुसार मेंढा पुढील तीन वर्षे सुदानच्या लेक्स स्टेटमधील अडुएल काउंटी मुख्यालयातील लष्करी छावणीत राहील. मेंढ्याचा मालक डुओनी मन्यांग ढल यालाही पीडितेच्या कुटुंबीयांना पाच गायी सुपूर्द कराव्या लागतील, असा निकाल स्थानिक न्यायालयाने दिला आहे.

आणखी वाचा : चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच

शिवाय मेंढ्याचा मालक ढाल हा बहुधा त्याची शिक्षा म्हणून मेंढाही गमावेल. कारण प्रदेशातील प्रथा कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला मारणारा कोणताही पाळीव प्राणी नंतर पीडितेच्या कुटुंबाला भरपाई म्हणून दिला जातो. लॅडबिबलने दिलेल्या माहितीनुसार, काऊंटी प्रशासक पॉल अधोंग मजक यांनी माहिती दिली की मेंढ्याचा मालक आणि पीडितेचे कुटुंबीय हे नातेवाईक आणि एकमेकांचे शेजारी आहेत. दोन्ही कुटुंबांनी साक्षीदार म्हणून काम करणाऱ्या पोलिस आणि समाजाच्या नेत्यांसोबत कराराची औपचारिकता करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

आणखी वाचा : Viral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं? हे पाहून हसून-हसून दुखेल पोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मेंढ्याने एखाद्या व्यक्तीचा बळी घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी अमेरिकेतही एका शेतात मेंढ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. मीडिया आउटलेटनुसार, ७३ वर्षीय किम टेलर मॅसॅच्युसेट्सच्या बोल्टनमधील कल्टिवेट केअर फार्म्समध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत होती, तेव्हा तिला मेंढ्याने गंभीर जखमी केले. आपत्कालीन सेवा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आला.