Elder Man Video Viral: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ चर्चेत असतात. कधी कॉमेडी, तर कधी डान्स व्हिडीओ, तर कधी धक्कादायक व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आपण लगेच स्क्रोल करतो परंतु काही व्हिडीओ असे असतात जे कायम लक्षात राहतात.

सोशल मीडियावर अनेकदा वयोवृद्ध मंडळींचे व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. यात काहीजण अभिनय करताना तर काहीजण आपली कलाकुसर दाखवताना दिसतात. पण सध्या एक आजोबा चांगलेच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एका वयोवृद्ध माणसाने सिगारेट ओढता ओढता हद्दच पार केली.

आजोबांचा व्हिडीओ व्हायरल (Elder Man Smokes Cigarette)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी डान्स परफॉरमन्स सुरू आहे. हा डान्स शो बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली आहे. याच गर्दीत एक आजोबा सिगारेट ओढताना दिसत आहेत. सिगारेट ओढत ते आजोबा चक्क जळती सिगारेट तोंडात ठेवताना आणि आपल्या नाकातून धूर काढून दाखवताना दिसत आहे.

व्हिडीओची लिंक खाली दिलेली आहे

https://www.instagram.com/7vi_fail_memer/reel/DJyZEDFSBvw

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @7vi_fail_memer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तर “नाद पाहिजे माणसाला नाद” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बाबांनी नाद केला” तर दुसऱ्याने “जवानी खूप गाजवली असेल…” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बाबा एकच नंबर”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधीही वयोवृद्ध लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या आजोबांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.