Shocking Video: आई वडिलांचं आणि त्यांच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारे पालक अनेकदा संकटांना सामोरे जात असतात. अगदी बाळ जन्माला आल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत दोघं आई बाबा आपल्या मुलांना सांभाळतात, त्यांचं रक्षण करतात. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ते आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. एवढंच नाही तर आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी त्यांचा जीव वर-खाली होतो. पण स्वत:च्याच लेकराला जपणाऱ्या त्या पलकांना मुलगा जड झाला तर…
सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलाबरोबर काय केलंय ते पाहाच…
लेकराला रस्त्यात सोडलं अन्…
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती स्कूटरवरून दोन लहान लेकरांबरोबर रस्त्यावरून जाताना दिसतेय. तितक्यात रस्त्याच्या मधोमध ती व्यक्ती गाडी थांबवते आणि लहान बाळाला रस्त्याच्या मधोमध सोडून निघून जाते. हा व्हिडीओ विएतनाममधला असल्याचं कॅप्शनमधून कळून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @lokshevay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “माणुसकीला काळीमा फासणारी घटना” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
“विएतनाममधील एका रस्त्यावर घडलेला हृदयद्रावक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने आपल्या लहानग्या मुलाला रस्त्याच्या मधोमध सोडून निघून जाण्याचा संतापजनक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. निष्पाप बालक रडत रस्त्यावर उभं असलेलं हे दृश्य पाहून मानवतेवर विश्वास डळमळीत होतो. समाजमनाला हादरवून टाकणारा हा प्रकार अत्यंत दुःखद आणि विचार करायला लावणारा आहे.” असंदेखील या कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.४ मिलियन व्हयुज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काहींना मुलं देव देव करूनही होत नाही आणि ज्यांना मिळाली त्यांना जड झाली आहेत. अजून काय काय पाहावं लागणार आहे देव जाणो” तर दुसऱ्याने “कलियुग इतके वाईट असणार कल्पना ही नव्हती” अशी कमेंट केली. तर एकाने “ज्यांना बाळ होत नाही त्यांना विचारा बाळाची किंमत” अशी कमेंट केली.