Viral video: बेडूक आणि साप हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात. साप बेडकाला खातो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. म्हणून बेडूक सापापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. पण एका बेडकाने अशी हिंमत दाखवली आहे. की तुम्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल. साप आणि बेडकाच्या भांडणाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका साप आणि बेडकाच्या भांडणाबद्दल सांगणार आहोत. पण या भांडणाची खास गोष्ट अशी आहे की या भांडणात चक्क बेडकाचा विजय झाला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या दोघांच्या फाईटींगचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झालाय. साप आणि बेडकाच्या लढाईमध्ये कायम सापाचा विजय होतो. साप बेडकाला खातो हे आपल्याला माहीत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.
साप हा जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. सापाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडतो. साप बेडकांना जिवंत गिळत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा माणसांना सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की आयुष्यात कधीही हार मानू नये. तसेच कुणाला कमीही समजू नये.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सापानं बेटकाला अक्षरश: गिळून टाकलं आहे. बेडूक सापाच्या पूर्णपणे पोटात गेल्याचं दिसत आहे. मात्र तरीही बेडुक चक्क सापाच्या पोटातून वारंवार बाहेर येताना दिसत आहे. साप पुन्हा पुन्हा त्याला पोटात टाकत आहे तर ह बेडुक त्याच ताकदीने पुन्हा एकदा अगदी सापाच्या तोंडाजवळ येत आहे. बेडूक सापाच्या पोटात चालताना बाहेर येताना स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने केलाय त्याचा व्हिडीओसुद्दा वायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ zadipatticha__golya__mul_city नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “कधीच कुणाला हलक्यात घेऊ नका” तर आणखी एकानं, “म्हणून कुणालाच कमी समजू नका” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत