सध्याच्या काळात लोकांची जीवन बदलले आहे. सतत धावपळीचे जीवन जगण्याचे जणू त्यांना सवय झाली आहे. त्यामुळे त्यांना शांत आणि स्थैर्य असलेलं आयुष्य काय असतं हे माहितचं नाही. शहरातील धावपळीच्या जीवनामध्ये निर्सगा्च्या सानिध्यात राहणे काय असते? साफ हवा आणि स्वच्छ पाणी मिळणे किती चांगले असते हे बऱ्याच लोकांना माहित नाही. कित्येक लोक आपलं आयुष्य धावपळीतचं जगत असतात पण अमेरिकेतील एका व्यक्तीने या धावपळीच्या आयुष्याला (Man left job live in jungle) राम राम ठोकला आणि थेट जंगलात जाऊ राहू लगाला. इतकेच नव्हे तर त्याने जंगलामध्ये असे घर तयार केले आहे जे पर्यावरणासाठी अनुकूल आहे.

मेट्रो वेबसाइटनुसार, उत्तर (North California) कॅलिफोर्नियामध्ये राहणारा 35 वर्षीय रॉबर्ट ब्रेटन एका सुपरमार्केटमध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. त्याचं काम चांगलं चाललं होतं. पण तो स्वत:ला निसर्गाच्या जवळ जाणू शकला नाही. म्हणूनच तो नोकरी सोडून हवाईला गेला आणि जंगलात राहू लागला (Man left job in city live in jungle). 2011 पासून तो असेच आयुष्य जगत आहे. त्या काळात त्याने अमेरिकेचा जवळजवळ प्रत्येक भाग व्हॅनने फिरला आणि हवाईच्या जंगलात आपले अनोखे घर बांधण्यासाठी सर्वोत्तम जागा शोधली.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

हेही वाचा- अमेरिकन यूट्यूबर म्हणे, ”चलो भाई, वापस बिहार चलते है!” कारण ऐकून चक्रावले लोक, म्हणाले,”…

हवाईमध्ये स्वतःचे ट्री हाऊस बनवले

2020 मध्ये, त्याच्या टिकटॉक कमाईने, त्याने 24 लाख रुपयांमध्ये एक छोटी जमीन खरेदी केली आणि आता तो जिथे राहतो तिथे स्वतःचे ट्री हाऊस बांधले. तो म्हणतो की, आता त्याला त्याच्या जुन्या आयुष्याशी संबंधित काहीही आठवत नाही. रॉबर्ट त्याच्या आयुष्याशी निगडीत छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

हेही वाचा – एक चूक अन् ४० मगरींचा एका व्यक्तीवर भयानक हल्ला! ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

रॉबर्ट स्वतःला एका खास पद्धतीने निसर्गाच्या जवळ ठेवतो

इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात. तेथे तो लोकांना सांगतो की, तो स्वतःचे अन्न कसे पिकवतो जे कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक वापरणे वाढत नाही. शहरीकरणापासून दूर राहून निर्मळ जीवन जगत असल्याचे तो सांगतो. अशा प्रकारे, तो निसर्गाच्या अगदी जवळ राहण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक व्हिडिओंमध्ये तो शेती करताना, समुद्रकिनारी बसून मासे पकडताना दिसत आहे. तो सोशल मीडियाशी जोडला गेला तर त्याने शहरी जीवन पूर्णपणे सोडलेले नाही, असे म्हणत अनेकजण त्याच्यावर टीका करतात. अशा लोकांना त्यांचे उत्तर असे आहे की, याद्वारे तो आपल्या जीवनातील सुखसोयी लोकांना सांगू शकतो आणि प्रेरित करू शकतो.