सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधले अनेक व्हिडीओ भारतीयांचे हटके जुगाड दाखवणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाइक चालवताना दिसत आहे. पण या बाइकवरील सामान आणि माणसं पाहून तुम्हीही अवाक व्हाल. या बाइकवर बाइक चालवणाऱ्या व्यक्तीसह ५ मुलं, एक महिला, २ कुत्रे बसलेले दिसत आहेत, इतकेच नाही तर घरातील भरपूर सामान या बाइकवर रचण्यात आलेले दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : भूक अनावर झाल्याने हत्तीने चक्क…; Video शेअर करत IAS Officer सुप्रिया साहू यांनी व्यक्त केली खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले असून, अनेकांनी यावर सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. ‘या व्यक्तीला जर पकडले तर त्याला दंड भरण्यासाठी कर्ज काढावे लागेल’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यूj मिळाले आहेत. अशाप्रकारे जुगाड करणे जीवावर बेतू शकते त्यामुळे सर्वात आधी सुरक्षेचा विचार करावा, असा सल्ला नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिला आहे.