Viral Video : नुकताच गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. गणेशोत्सवात लोक आवडीने डान्स करतात. असाच गणपतीच्या मंडपात डान्स करणाऱ्या काकांचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये काका भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
पुण्यातील गणेशोत्सव पाहायला वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकं येतात. येथील गणेशोत्सव खूप लोकप्रिय आहे. येथील ढोल ताशाचा गजर असो किंवा लोकांचा उत्साह पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हायरल व्हिडीओ सुद्धा पुण्यातील आहे.

हा व्हिडीओ गणपतीच्या मंडपातील आहे आणि डिजेच्या तालावर लोकं या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण मंडळीसुद्धा तुफान डान्स करताना दिसत आहे पण या तरुणाईमध्ये भन्नाट डान्स करणाऱ्या काकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काकांच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही काकांचे चाहते व्हाल. काकांचा उत्साह पाहून तरुण मंडळीसुद्धा त्यांच्यासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : गौतमी पाटील नऊवारीत नाही तर सहावारी साडीत थिरकली! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

punekar2.0_og या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विचारले, “कुणाला हे काका माहिती आहेत का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “हे कामत काका आनंदनगर, सिंहगड रोडला राहतात. टेल्को कंपनीत नोकरी करतात. रोज सकाळी आम्ही भेटतो. ते खूप छान डान्स करतात.” एका युजरने लिहिलेय, “हे दर वर्षी मे महिन्यात कोल्हापूरमध्ये शिवजयंतीला नाचायला येतात….” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांचे नाव धनंजय कामत आहे”