Uncle Dance Video : लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबांकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी काही खास कार्यक्रम ठेवले जातात, जे अगदी धुमधडाक्यात साजरे केले जातात. कोणत्याही लग्नात नाच-गाणे नसेल, तर ते लग्न अपूर्ण वाटू लागते. त्यात आजकाल लग्नाच्या वरातीत नाचण्याची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. वरातीत पाहुणे मंडळींसह नवरा-नवरीदेखील डान्स, मस्ती करताना दिसतात. मात्र, एका लग्नाच्या वरातीत नवरा-नवरी राहिले बाजूला; पण एका काकांनी असा काही जबरदस्त डान्स केला की, पाहुणे मंडळींनी त्यांचा डान्स पाहण्यासाठी मंडपात गर्दी केली.

लग्न समारंभात बॅण्ड, वरात या सर्वांत खास गोष्टी असतात. कारण- नवरा-नवरीबरोबर त्यांच्या कुटुंब व मित्र परिवारालाही यानिमित्ताने मनसोक्त नाचण्याचा आनंद घेता येतो. सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वरातीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एका काकांनी असा काही भन्नाट डान्स केलाय की, पाहणारेही हसून हसून अक्षरश: वेडे झाले. कारण- काका नाचता नाचता एवढ्या भारी एक्स्प्रेशन्स देतायत की, ढोल वाजणारेही पाहून खूश होतायत.

व्हिडीओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या वरातीत खास ढोल वाजवणारे बोलावण्यात आले आहेत. त्या ढोलाच्या तालावर वरातीत सहभागी झालेले पाहुणे आनंदाने नाचत आहेत. त्यात पाहुणे मंडळींमध्ये एक काका मात्र अशा काही एकापेक्षा एक भारी डान्स स्टेप्स करतायत की, लोकांना हसू आवरणे कठीण होत आहे. कधी हातावारे करून, तर कधी तोंडाचे वेगवेगळे हावभाव करत ते नाचतायत. जे पाहून नाचणाऱ्या पाहुणे मंडळींनाही अजून उत्साहाने नाचण्यास प्रोत्साहन मिळतेय. अशा प्रकारे नाचत नाचत काका ढोल वाजवणाऱ्या वादकाकडे जातात आणि जबरदस्त डान्स करू लागतात. अखेर ढोल वाजवणारा वादक ढोल काढून काकांच्या गळ्यात देतो. मग काका ढोल वाजवत नाचू लागतात. आता या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Also Read : “जगात पैसा आहे, फक्त कमावता आला पाहिजे” गंगा नदीत बसून व्यक्ती करतेय भरघोस कमाई; पाहा VIDEO\

काकांचा डान्स पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल. dr_rais_meer_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना, ‘ढोलकीवाल्याला त्रास झाला असेल’ अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलेय की, इतिहासात पहिल्यांदाच काका इतके खूश झाले असतील. दुसऱ्या युजरने लिहिले की, काकाने नक्कीच ड्रिंक्स घेतले आहे. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, क्रॅब डान्स लाँच. शेवटी एका युजरने लिहिले की, लग्नात असा कोण डान्स करतो?