Viral Video: सोशल मीडियामुळे जगभरातील कोणत्याही दुर्मीळ गोष्टी पाहणे अगदी सोपे झाले आहे. घरबसल्या आपल्याला परदेशांतील विविध गोष्टी, घटना पटकन पाहता येतात. असाच एक परदेशातील व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे; ज्यामध्ये आकाशात कधीही न पाहिलेले सुंदर दृश्य दिसत आहे. या व्हिडीओला नेटकरी पसंतीही देत आहेत.

काही दिवसांपासून स्पेन आणि पोर्तुगालमधील रात्रीच्या आकाशात दिसलेल्या भारावून टाकणाऱ्या सुंदर दृश्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओंतून या उल्का असल्याचे म्हटले जात होते. आता या सुंदर दृश्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यामध्ये तुम्हाला आकाशातील नयनरम्य देखावा दिसेल.

हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रात्री गच्चीवर व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या तयारीत बसली होती. ती व्हिडीओ सुरू करते तेवढ्यात अचानक रात्रीचे काळेकुट्ट आकाश निळे होते. त्यावेळी आकाश निळे झालेले पाहून ती आश्चर्यचकित होऊन वर पाहते, तर तिला आकाशातून एक तीव्र प्रकाश पुढे सरकताना दिसतो आणि तो पुढे काही क्षणांत कमी होत नाहीसा होतो. हा सुंदर व्हिडीओ शेअर करीत त्या मुलीने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे सुंदर दृश्य पाहून मी खूप भारावून गेले आहे. मला जे अपेक्षित होते, ते मी पाहिले.”

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @milarefacho या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “तू खूप लकी आहेस तुला हे दृश्य पाहायला मिळालं.” तर आणखी एकाने लिहिलेय, “कोणत्याही चित्रपटानं यापेक्षा चांगलं काम केलं नसतं… आयुष्यभराचा अनमोल क्षण!” तर तिसऱ्या एका युजरने लिहिलेय, “हा क्षण तू कधीही विसरणार नाहीस.”

पाहा व्हिडीओ:

हेही वाचा: माणुसकीला काळिमा! दोन तरुणांनी भटक्या कुत्र्याला फेकले ५० फुटांवरून अन् पुढे घडलं असं काही… Viral Video पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही तासांपूर्वी स्पेन, पोर्तुगालमधील असे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. X (ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर करत एका युजरने सांगितले की, आताच स्पेन आणि पोर्तुगालच्या आकाशात एक उल्का दिसली. हे खूप आश्चर्यचकित करणारे आहे. तसेच रात्रीच्या आकाशात शेकडो किलोमीटर लांब फ्लॅशदेखील दिसले आहेत.