Couple Viral Video Today: प्रेमात माणूस पार आंधळा होतो असे म्हणतात काही अंशी हे खरंय पटवून देण्याचं काम सोशल मीडियावरील जोडपी करतात. अलीकडेच सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आजवर तुम्ही प्रेमाची ताकद कशी जगाला झुकवू शकते हे ऐकलं असेल आज त्याचं उदाहरण पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हायरल क्लिपमध्ये चक्क एक कपल भररस्त्यात एकमेकांच्या मिठीत एवढं रममाण झालं आहे की त्यांना आपण कुठे आहोत, काय करतोय याचंही भान राहत नाही. या प्रेमवेड्या कपलने रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प करून टाकली होती.

या व्हिडिओच्यावर लिहिलेल्या मजकुरानुसार हा आसनसोल मधील व्हायरल व्हिडीओ असल्याचे समजतेय. रस्त्यावरील एखाद्या गाडीतून हा व्हिडीओ शूट केलेला असावा. सुरुवातीला लांबूनच एक जोडपं एकमेकांना मिठी मारून रस्त्यात उभं असल्याचं दिसतंय. काही वेळाने सिग्नल सुटतो पण तरीही ही दोघं बाजूला होत नाहीत. मागे अडकून पडलेल्या गाड्या यावेळी जोरजोरात हॉर्न वाजवू लागतात पण तरीही जोडपं जागचं हलत नाही. या बेभान जोडप्याला वेगळं करण्यासाठी लोक सुद्धा आपल्या गाड्या सोडून आले आणि मग जे झालं ते तुम्ही स्वतः पाहा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भररस्त्यात बेभान झालं जोडपं, आधी मिठी मारली मग..

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा एक व्हिडीओ भिवंडीमधून सुद्धा व्हायरल झाला होता. यामध्ये तर एका जोडप्याने धावत्या बाइकवरच आपल्या प्रेमाचं प्रदर्शन सुरु केलं होतं. यात एक बुरखा घातलेली तरुणी बाईकच्या टाकीवर म्हणजेच बॉयफ्रेंडच्या पुढ्यात बसून त्याला मिठी मारत होती. या जोडप्याला थांबवल्यावर त्यांनी मध्ये आलेल्या अन्य प्रवाशाला सुद्धा धमकावलं होतं.