Desi Jugaad Viral Video: गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. आपण भारतीय आपल्या प्रत्येक गरजेला जुगाड करून काही ना काही उत्तर मिळवतोच. अनेकदा सोशल मीडियावर असे जुगाड व्हायरल होतअसतात . आता सुद्धा हापशी म्हणजेच बोअरवेलचा हॅन्डपंप वापरून जमिनीतुन पाणी काढण्यासाठी एक भन्नाट जुगाड गावातील जुगाडूने शोधून काढला आहे. अर्थात अलीकडे शहरात हॅन्डपंप फार वापरले जात नाहीत पण काही गावाकडे अजूनही खोल विहिरीतून पाणी काढण्यापेक्षा हॅन्डपंप सोपा पर्याय ठरत आहे. असं असलं तरी या हॅन्डपंपचा वापर करताना हात दुखून येतात. अशावेळी या माणसाने शोधून काढलेला जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका माणसाने सायकलचे काही तुटलेले भाग जोडून हॅन्डपंप मधून पाणी काढण्यासाठी जुगाड केला आहे. एक बटण दाबल्याबवर हा ऑटोमॅटिक हॅन्डपंप सुरु होतो. ज्याप्रमाणे सायकलचे पॅडल मारले जातात तशी ही सायकलची चैन फिरू लागते आणि एका रश्शी व काठीच्या सहाय्याने तो हॅन्डपंप फिरू लागतो. हातही न लावता हॅन्डपंप पाण्याने बादली भरू लागते. सायकलची चैन, पॅडल, सॉकेट एवढंच सामान व एका इलेक्ट्रिक मोटारने त्याने हा जुगाड केला होता.

Video: पाण्यासाठीचा जुगाड व्हायरल

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये दारात उभ्या तरुणाला खाली खेचलं अन्…Video पाहून म्हणाल, “माणुसकी हरवत चाललीये”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कौतुक करत कमेंट केल्या आहेत. हे टॅलेंट भारताच्या बाहेर नाही गेलं पाहिजे अशा कमेंट पाहायला मिळत आहेत. १ लाख ८३ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तुम्हाला या भन्नाट जुगाडांविषयी काय वाटतं व भारतीयांच्या हुशारीबाबत तुम्ही काय सांगाल हे कमेंट करून नक्की कळवा.