Viral Video in college : शाळा कॉलेजचे दिवस हे अविस्मरणीय असतात. शाळा कॉलेजातील गमती जमती, मजेशीर किस्से, असंख्य आठवणी आजही मनात जीवंत असतात. सोशल मीडियावर शाळा कॉलेजातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून पुन्हा जुने दिवस आठवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क वर्ग सुरू असताना विद्यार्थी असं काही करतो की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. भर वर्गात शिक्षिका शिकवत असताना हा विद्यार्थी काय करतो, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल.

या व्हायरल व्हिडीओ एका कॉलेजातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की वर्ग सुरू आहे आणि शिक्षिका शिकवत आहे पण मागच्या बाकावर बसलेला एक विद्यार्थी असं काही करतोय की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तो चक्क भेळ बनवतोय.व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो सुरुवातीला कांदा कापतो. त्यानंतर तो बारीक मिरची चिरतो. त्यानंतर एका पातेल्यात बाकीक चिरलेला कांदा व मिरची टाकतो आणि त्यानंतर मुरमुरे टाकतो. लिंबू पिळतो, थोडं तिखट मीठ आणि फरसाण टाकतो आणि भेळ बनवतो.

तो इथेच थांबत नाही तर काही वेळानंतर तो चक्क ब्रेड जॅम बनवताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. इतर विद्यार्थी हे पाहून हसत आहे. पुढे व्हिडीओत विद्यार्थी भेळ खाताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

heyyy.sidxd या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कॉलेज डायरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भविष्यातील बिझिनेस प्लॅनिंग वर्गात करत आहात” तर एका युजरने लिहिलेय, “तुझे मित्र खूप नशीबवान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “क्लासरूमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा नाही का?” एक युजर लिहितो, “भाऊ आयुष्यभरासाठी आठवणी तयार करतोय” तर एका युजरने लिहिलेय, “याने तर शाळेतच स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.