Viral Video : आज्जी आणि नातवंडाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. आज्जी नातवडांसाठी मायेची शिदोरी असते. दुसरी आई असते. ती तिच्या नातवंडाना आनंद मिळावा म्हणून वाट्टेल ते करते. उन्हाळ्यात लहान मुलांना आजोळी जायला आवडण्याचं एक कारण हे आज्जीचं प्रेम असते. नातवंडाना नेहमी हसत पाहणाऱ्या आज्जीला तिच्या नातवंडानी सरप्राइज दिले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या आज्जी आजोबांची आठवण येईल तर काही लोकांना बालपणीचे दिवस आठवेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला जुने घर दिसेल. नातवंड आज्जीचे डोळे बंद करून तिला घरात घेऊन येत आहे. तिच्याबरोबर आजोबा सुद्धा आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नातवंड तिला स्वयंपाकघरात नेतात आणि तिच्या डोळ्यांवरून हात काढतात. जेव्हा ती बघते तेव्हा तिला सर्व जण एक मोठी पेटी दाखवतात. त्या पेटीमध्ये सामान ठेवलेले दिसत आहे. आज्जी जेव्हा ती पेटी बघते तेव्हा नातंवड आनंदाने ओरडतात. आजोबा आज्जीला सांगतात की आता काहीही ठेवायचं असेल तर यात ठेवायचं. हे सर्व पाहून आज्जीचा आनंद गगनात मावेनासा असतो. आज्जी खूप खूश होते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
konkan__soundary_08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुटुंब आणि नातवंड जेव्हा आजीला Surprise देतात तेव्हाचा क्षण..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोळ्यात पाणी आलं भाऊ …हल्ली कुठे बघायला भेटतं एवढं निरागस नातं..” तर एका युजरने लिहिलेय, “आजीचा जादूची पेटी, त्यात एक वेगळी गंमत असते बरणीतले लाडू, खाऊ, आंब्याचे साठे, कपड्यात गाठ मारून ठेवलेली चटणी, तुपाची बाटली, मसाल्याच्या डब्यात लपून ठेवलेले पैसे” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या आजीकडे लाकडाची पेटी होती. आजीची जुनी आठवण” एक युजर लिहितो, “नातवंडे म्हणजे आजीची आजोबांची दुधावरची साय .. अशी नातवंडे आणि प्रेमळ आजी मिळणे म्हणजे भाग्य ..” तर एक युजर लिहितो, “म्हणूनच लहान मुले घरात हवी”