Viral Video: मागील काही दिवसात सोशल मीडियावर अत्यंत विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दिल्ली मेट्रोमधील अश्लील व्हिडिओच्या पाठोपाठ आता मुंबईत सुद्धा काही बेभान मंडळींनी उच्छाद मांडला आहे. आता सध्या उल्हासनगर येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या बाईकवर मागच्या सीटवर बसून चक्क आंघोळ करताना दिसत आहे. यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंडच्या अंगावरही पाणी ओतते. इतका भीषण प्रकार पाहून लोकांनाही त्यांच्यावर अगदीच जहरी शब्दात टीका केली आहे.

सध्या सगळीकडेच उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होतेय. यामुळे उन्हापासून वाचण्यासाठी अगदी काही सेकंद गारवा मिळवा म्हणूनही अनेकजण नानाविधी प्रयोग करत आहेत पण त्यातील हा भररस्त्यात आंघोळीचा प्रकार अगदीच मर्यादा सोडून असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. यातील बहुतांश लोकं ही केवळ व्हायरल होण्याच्या नादाने असे विचित्र प्रकार करतात पण त्यांच्या या कृतीने रस्त्यावर ये- जा करणाऱ्यांची मान शरमेने खाली जाते यांची त्यांना जाणीवही होत नाही अशा प्रकारच्या टीका या व्हिडिओवर होत आहेत.

Video: भररस्त्यात बाईकवर अंघोळ

हे ही वाचा<< बीअरवर धावतेय बाईक, जुगाडू तरुणाचा विचित्र प्रयोग, मायलेज व फीचर्स बघून धक्काच बसेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या अकाउंटवर महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा टॅग करण्यात आले आहे. सदर व्हिडीओ उल्हासनगरमधील असून मनोरंजनाच्या नावाखाली असा मूर्खपणाला परवानगी आहे का? सार्वजनिक ठिकाणी अशी वागणूक करणाऱ्यांवर पद्धतशीर कारवाई व्हायलाच लोकांनी या व्हिडिओवर केली आहे. साधारण व्हिडीओ पाहता हा प्रकार एखाद्या रील किंवा तत्सम हेतूनेच बनवलेला असावा असे म्हणता येईल.