Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्लॉगर्स नवनवीन व्हिडिओ शेअर करतात. सुंदर निसर्गरम्य ठिकाणचे, खाद्यपदार्थांच्या ठिकाणचे, रेसिपीचे व्हिडिओ, डान्स गाण्याचे व्हिडिओ शेअर करतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण हा व्हिडिओ शेअर करतात. पण तुम्ही कधी माकडाला व्लॉगिंग करताना पाहिले आहे का?. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत.

सध्या सोशल मीडियावर या माकडाची खूप चर्चा आहे. या माकडाचे नाव बबलू आहे. हे माकड भारतभर फिरतो, नवनवीन ठिकाणाचे व्हिडीओ शूट करतो आणि आपल्या हटके अंदाजात माहिती सांगतो. त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर लाखो व्ह्यूज येतात. लोक आवडीने त्याचे व्हिडीओ लाइक करतात, शेअर करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माकड व्लॉगिंग कसा करतो आणि माहिती कशी सांगतो? त्यासाठी तुम्हाला बबलू माकड नेमका आहे तरी कोण, हे जाणून घ्यावं लागेल.

कोण आहे बबलू माकड?

तुम्ही आजवर अनेक माकडं पाहिली असतील जे झाडांवर उड्या मारतात, मजेशीर गोष्टी करतात, सर्कसमध्ये कला दाखवतात पण तुम्ही व्लॉगिंग करणारा माकड आजवर बघितला नसेल. हा बबलू माकड मात्र व्लॉगिंग करतो कारण हा कोणी साधारण माकड नाही तर ए- आय जेनरेटेड माकड आहे. म्हणजेच हा एआयच्या विश्वातला ट्रॅव्हल इनफ्ल्यूअन्सर आहे, जो भारतभर फिरतो आणि व्लॉग बनवतो.

सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तो स्थानिक भाषेत संवाद साधतो. मजेशीर संवादाने सर्वांचे मन जिंकतो. मीडिया रिपोर्टनुसार, बबलू माकडाला क्रिएट करण्यामागे एका तरुणाचा हात आहे. त्या तरुणाचे नाव लखन सिंह आहे आणि दिल्ली येथे राहतो. त्याने आपल्या क्रिएशनपासून बबलू हे एआय पात्र निर्माण केले आणि त्या माध्यमातून तो लोकांचे मनोरंजन करतो आणि त्यांना भारत सुद्धा दाखवतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

vloggerbabloo_ai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या माकडाचे असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. या प्रत्येक व्हिडीओवर लोकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.