साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत किंवा पाहत असतो. तुम्हाला माहिती आहे का की भारतात दरवर्षी ५० हजार लोकांचा मृत्यू साप चावल्यामुळे होतो. सर्पदंशावर योग्य उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, नुकतेच एक असे प्रकरण समोर आले आहे, जे जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

घराच्या आजूबाजूला झाडं-झुडुपं असली की घरात वेगवेगळे प्राणी येण्याचा धोका वाढतो. अशातच साप घरात घुसण्याचा धोका सर्वात जास्त असतो. साप हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. याच्या दंशाने माणसाचा क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो. तुर्कस्तानमध्ये एका लहान मुलीला साप चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रागाच्या भरात त्या मुलीने सापाला उचलले आणि त्याचा चावा घेतला. यानंतर सापाचा मृत्यू झाला असून ती मुलगी आता ठीक आहे.

द सनच्या वृत्तानुसार, ही लहान मुलगी दोन वर्षांची होती आणि तिच्या खोलीत खेळत असताना तिच्या खोलीत साप घुसला. त्या सापाला खेळणे समजून ही मुलगी त्याच्याशी खेळू लागली. यावेळी सापाने मुलीच्या ओठांचा चावा घेतला. यानंतर मुलीला राग आला आणि तिने सापाचा चावा घेतला. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे या सापाचा मृत्यू झाला. या मुलीने सापाचा इतका कडकडून चावा घेतला की त्याचे दोन तुकडे झाले. यानंतर या मुलीच्या चेहऱ्यावर रक्त लागले होते. यानंतर मुलगी रडू लागल्याने घरातील लोक तिच्याजवळ आले. यावेळी तिच्या खोलीतील भयानक दृश्य पाहून त्यांच्या पायाखालील जमीन सरकली.

साप चावला तर काय करावे? घाबरण्याऐवजी ‘या’ पद्धतींचा करा अवलंब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या मुलीला एक दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. सध्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. हा साप तुलनेने कमी विषारी होता, अन्यथा मुलाला जास्त त्रास होऊ शकला असता, असेही सांगण्यात आले.