Snake Buffalo Viral Video: सापाचं कोणी कधी नाव काढलं तरी आपल्याला धडकी भरते. फक्त माणसंच नाही तर काही प्राणीदेखील सापाला प्रचंड घाबरतात. कारण- विषारी सापाच्या दंशानं मृत्यू होण्याची शक्यता असते. साप हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे अनेकांना सापापासून भीती वाटते. सापाच्या नादाला सहसा कोणी जात नाही. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटिझन्सचं डोकंच फिरलंय. या थरारक व्हिडीओमध्ये दिसतंय की, म्हैस कोब्रा सापाला चुकून ‘चारा’ समजते आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करते. म्हशीचा सापाबरोबरचा हा व्हिडीओ (video) तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
व्हिडीओची सुरुवात एका झाडाला बांधलेल्या म्हशीपासून होते. ती शांतपणे उभी असते; पण काही क्षणांतच झाडाच्या दिशेनं एक कोब्रा साप सरपटत जातो. ही भयंकर स्थिती लक्षात येण्याआधीच म्हैस त्या सापाला चाटायला सुरुवात करते आणि त्याला आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करते. हे दृश्य काही सेकंदांपुरतं असलं तरी ते इतकं थरारक आहे की, श्वास रोखल्याशिवाय तुम्ही बघूच शकणार नाही.
एका क्षणी तर असं वाटतं की, म्हैस तो साप चावूनच टाकणार आहे; पण सुदैवानं असं काही होत नाही. कोब्रा साप त्वरित झाडाच्या खोडावर चढतो आणि स्वतःचा जीव वाचवतो. मात्र, ही संपूर्ण घडामोड कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे ती आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होतेय.
हा व्हिडीओ Instagram वर @mjunaid8335 या युजरने पोस्ट केला आहे आणि त्याला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाइक्स मिळालेत. हजारो लोकांनी कमेंट्स करीत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी त्यामध्ये कॅमेरामनच्या वागणुकीवर सवालही उपस्थित केला आहे.
एक युजर म्हणतो, “कोणी मेलं तरी चालेल; पण कॅमेरामनचा अँगल परफेक्ट असलाच पाहिजे” तर दुसरा लिहितो, “इतिहास साक्ष आहे. कॅमेरामन कधीच कुठल्याही प्राण्याला वाचवत नाही.”
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना पाहून पुन्हा एकदा इंटरनेटवर प्राण्यांच्या सुरक्षेची आणि व्हिडीओ शूट करताना जबाबदारीची चर्चा रंगली आहे. याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जिथे एक व्यक्ती स्वतःच्या हातानं मोठा कोब्रा उचलताना दिसला होता, ज्याची चर्चा जगभर झाली होती.
साप आणि म्हैस यांच्यातील ही जीवघेणी गैरसमजुतीची लढत पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.