सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोजच्या तणावाचा विसर व्हावा, लोकांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने हे व्हिडीओ अधिकाधिक शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ पोट धरून हसवणारे तर काही आपल्याला थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क बाइक डोक्यावर घेऊन बसवर चढताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका माणसाने डोक्यावर बाइक घेतलेली दिसत आहे. सुरूवातीला हा माणूस बाइक डोक्यावर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे, असे वाटते. पण नंतर हा माणूस तिथे उभ्या असलेल्या बसच्या पायऱ्या चढू लागतो. बाइकचे इतके वजन डोक्यावर असुनही हा माणूस अगदी सहजपणे बसवर चढताना दिसत आहे. पाहा थक्क करणारा हा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ :

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत, काहींनी ‘हा खरा बाहूबली आहे’ अशा कमेंट्स केल्या आहेत.