scorecardresearch

धुळीच्या वावटळात अडकून पॅराग्लायडर थेट कुंपणालाच आदळला आणि झाडाला लटकला, VIRAL VIDEO पाहाच

पॅराग्लायडिंगचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उत्साहात पॅराग्लायडिंग करायला गेलेल्या किती तरी लोकांची आकाशात जाताच हवा टाइट झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे. पण आता पॅराग्लायडिंगचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला धडकीच भरेल.

Paragliding-video
(Photo: Youtube/ ViralHog)

पॅराग्लायडिंगचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उत्साहात पॅराग्लायडिंग करायला गेलेल्या किती तरी लोकांची आकाशात जाताच हवा टाइट झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे. अशा तरुण-तरुणींना आकाशात ओरडताना, रडतानाही तुम्ही पाहिलं आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरलं नाही. पण आता पॅराग्लायडिंगचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला धडकीच भरेल.

ऑस्ट्रियातील एक धक्कादायक आणि भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक पॅराग्लायडर त्याच्या उड्डाणाच्या तयारीत असतानाच अचानक धुळीच्या वावटळात अडकला. ही घटना २१ मार्च रोजी स्टॉबेनबर्ग, स्टियरमार्क येथे घडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल हॉगने YouTube वर अपलोड केला. २० सेकंदाच्या फुटेजमध्ये तो माणूस उड्डाणाच्या तयारीत असताना दिसत आहे. हवेत उड्डाण करायला सुरूवात करत अचानक तो धुळीच्या वावटळात सापडला. मग धुळीच्या वावटळात तो गोल गोल घिरत्या घेत थेट मैदानाच्या कुंपणालाच धडकला. त्यानंतर तो हवेतच इथून तिथे घिरक्या घालत थेट बाजुला असलेल्या उंच झाडालाच लटकला.

आणखी वाचा : वीज कोसळताना कधी पाहिली का?, थरारक दृश्याचा VIDEO VIRAL

झाडाला आदळल्यानंतर झाडाच्या काही फांद्याही देखील पडलेल्या दिसून आल्या. YouTube वर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मी माझ्या पॅराग्लायडरसह लॉन्च करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा धुळीच्या वावटळाने मला वर खेचलं आणि कुंपणाला आदळलो. मग झाडाला अडकलो. या घटनेत मला दुखापत झाली नाही.” हा व्हिडीओ पोस्ट होताच तो वाऱ्यासारखा पसरू लागालय.

आणखी वाचा : खोलीत महाकाय अजगराशी खेळत होती चिमुरडी, VIRAL VIDEO पाहून सारेच जण हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : “भाऊ, मला पाच किलो पीठ दे…” असं रडत रडत म्हणाला आणि एका रात्रीत नशीब पालटलं, पाहा हा VIRAL VIDEO

अशा घटना सर्रास घडत असल्याचे साहसी क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे. हवेच्या दाबामुळे असे प्रकार घडत असतात. त्याच वेळी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये असेही म्हटले की, कदाचित हे आता थांबलं पाहिजे हे सांगण्याची निसर्गाची पद्धत आहे. त्याचवेळी एका यूजरने असेही विचारले की, हे पाहून मी हसलो. हसण्यासाठी मी वाईट माणूस आहे का?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of man colliding with fence and stuck hanging on tree due to dust devil watch terrifying video prp

ताज्या बातम्या