Passengers Drink Beer and throw Bottles On Road Viral Video : एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात. स्त्यावरील इतर वाहन चालक किंवा प्रवाशांबरोबरच्या भांडणामुळे कॅब ड्रायव्हर्स अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. पण, अनेकदा या वादाला प्रवासी सुद्धा तितकेच जबाबदार असतात. वारंवार लोकेशन बदलणे, चुकीचा पत्ता सांगणे, पैसे देण्यास नकार देणे, बोलण्याची पद्धत, अगदी प्रवासारम्यान गैरवर्तवणूक करणे असो आदी अनेक कारणांमुळे वाद अगदी टोकाला जाऊन पोहचतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे; यामध्ये एका कॅब ड्रायव्हरने प्रवाशांची गैरवर्तवणूक कॅमेऱ्यात कॅप्चर केली आहे.

व्हायरल व्हिडीओ कोलकात्याचा आहे असा अंदाज बांधला जातो आहे. व्हिडीओतील कोणत्याही व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पण, ड्रायव्हरच्या आक्षेपाला न जुमानता काही प्रवाशांना कॅब ड्राइव्हरच्या धावत्या दारू पिताना दिसले आहेत. एवढेच नाही तर प्रवासी दारू पिऊन सार्वजनिक रस्त्यावर रिकाम्या बाटल्या सुद्धा फेकल्या. पण, कॅब ड्राइव्हरने हा सगळा प्रकार गुपचूप रेकॉर्ड करून घेतला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आदर नाही करू शकत तर त्रास देऊ नका (Viral Video)

व्हिडीओच्या सुरवातीला कॅब ड्रायव्हर, “टॅक्सीमध्ये कॅमेरा असणे का महत्त्वाचे का आहे? हे तुम्ही स्वतःच व्हिडीओतून बघा” असे म्हणतो. नंतर काही प्रवासी कॅबमध्ये चढताना दिसतात, सर्व दारूचे सेवन केलेले असते. ड्रायव्हर प्रवाशांना दरवाजा बंद करायला सांगतो. त्यानंतर ड्रायव्हरच्या समोर बसलेली महिला मागे बसलेल्या तिच्या मैत्रिणीला बाटली पुढे करून दारू पिणे थांबवण्यास सांगते आणि “ड्रायव्हरला पोलिसांची काळजी करू नका. आम्ही बाटली लपवू असे देखील म्हणते”. त्यानंतर महिलेच्या सीटवर एक पुरुष येऊन बसतो आणि दारू पिऊन बाटली रस्त्यावर फेकून देतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

तर अशाप्रकारे व्हायरल व्हिडीओमुळे आणि कॅब चालकाने गाडीत लावलेल्या कॅमेरामुळे त्यांना दररोज कोणत्याकोणत्या प्रवाशांचा सामना करावा लागतो हे सगळ्यांसमोर आले आहे. पण, तरीही कॅब ड्राइव्हरने प्रवाशांचा चेहरा ब्लर केला आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Incognito_qfs या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “तुम्ही एखाद्याचा आदर नाही करू शकत तर कृपा करून त्याला त्रास तर देऊ नका” ; अशी कमेंट एका युजरने केली आहे.