Video Shows Friend Gives Speech At Best Friends wedding : आपण ज्या गोष्टी घरात आई-वडिलांशी, भावंडांशी शेअर करू शकत नाही, त्या गोष्टी आपण मित्र-मैत्रिणींशी शेअर करतो. त्यामुळे आयुष्यात हक्काचा असा एकतरी मित्र असावा अशी इच्छा आपल्या सगळ्यांची असते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये मित्राने आपल्या जिगरी मित्राच्या लग्नात खास स्पीच दिलं आहे; जे पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल.
अनेकदा तुम्ही मैत्रिणींच्या लग्नात दुसऱ्या मैत्रिणीला स्पीच देताना पहिले असेल. पण, आज एका मित्राने त्याच्या खास मित्रासाठी स्पीच दिले आहे; जे ऐकून तुम्ही भारावून जाल. मित्राचा साखरपुडा किंवा लग्न असते. यादरम्यान त्याचा हा दिवस आणखीन खास करण्यासाठी मित्र स्टेजवर जातो आणि त्यांच्या मैत्रीचं खूप सुंदर शब्दांत कौतुक करतो, बोलता बोलता भावूक सुद्धा होतो. मित्र बोलत असताना नवरदेव मित्राचे सगळे बोलणे स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतो. शेवटी हात मिळवून मित्राला घट्ट मिठी मारतो; जे पाहून तुम्ही नक्की भारावून जाल.
आज तू बोलत नव्हतास, तुझी मैत्री बोलत होती (Viral Video)
तर मित्राने “मी जरी आत्ता मित्र, दोस्त असं म्हणत असलो तरी आम्ही कधी भावांपेक्षा वेगळ वागलो नाही. संग्रहालयात दाखवायला ठेवावा मित्र कसा असतो असा मित्र आहे माझा. बायका पुढचे सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करतात, वडाला फेरे मारतात, उपवास करतात. पण, सात जन्म मला हाच मित्र मिळावा यासाठी मी सुद्धा हे करायला तयार आहे. आयुष्यात माज करावा अशी खूप कमी नाती असतात, तुझ आणि माझ नातं सेम तसंच आहे मित्रा. अरे !! माज आहे मला माज तुझ्यासारखा मित्र मला मिळाला! ही दोस्ती तुटायची नाय..!!!” ; असे भाषण दिले आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @yashrajj.patil आणि @bhushan_511 इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून “भावा खरचं सोडू नको जिव गेला तरी असे मित्र खूप कमी मिळताता”, “मित्रा आज तू बोलत नव्हतास. तुझी मैत्री बोलत होती. प्रत्येक शब्दातून तुझं नातं जिवंत वाटलं… खरंच, असाच असतो खरा मित्र!” , “तुमच्या दोस्तीला कोणाची नजर नको लागायला…” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…