Mumbai Local Viral Video : बस, मेट्रोने प्रवास करणारे एकीकडे; तर खूप गर्दी असली तरीही मुंबई लोकलने प्रवास करणारे प्रवासी एकीकडे असतात. प्रियकरांशी बोलणारी मंडळी, जॉबच्या तक्रारी करणाऱ्या तरुण मुली, घर आवरून बाहेर पडणाऱ्या महिला तर कुटुंबाच्या पोटा-पाण्यासाठी कष्ट करणारे पुरुष या मुंबई लोकलमधून प्रवास करत असतात. या मुंबई लोकलच्या प्रवासातून प्रत्येक जण आपले दुःख, टेन्शन विसरण्याचा कोणता ना कोणता मार्ग शोधून काढतात. तर आज सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

ट्रेनमधून प्रवास करताना भजन, गाणी म्हणून सगळ्यांचा प्रवास सुखकर करणारे अनेक प्रवासीसुद्धा आहेत; तर याच प्रवाशांचा गाणे गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. तर अशाच एक प्रवाशाला याचे भाग्य लाभले आहे. वृद्ध मंडळींचा एक ग्रुप ‘सोचेंगे तुम्हें प्यार करे के नहीं’ गाणे गाताना दिसत आहेत. प्रवाशांचा हा ग्रुप बॉलीवूडचं हे गाणं उत्तमरीत्या सादर करीत आहे. इतर प्रवासीसुद्धा टाळ्यांच्या गजरात गाणं म्हणत त्यांना साथ देताना दिसत आहेत. काही जण तर हे दृश्य त्यांच्या मोबाइलमध्येही शूट करून घेत आहेत; तर अनेक जण प्रवाशांचा हा मंत्रमुग्ध आवाज ऐकून त्यांच्याकडे एकटक पाहताना दिसत आहेत.

असे चांगले लोक फक्त मुंबईतच आढळतात (Viral Video) :

व्हायरल व्हिडीओ @ideshnoor या युजरने शेअर केला आहे. युजर सहा महिन्यांहून अधिक काळ मुंबई लोकलने प्रवास करतो आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन आश्चर्य घेऊन येतो आहे, असे त्याचे म्हणणे आहे. तसेच आज त्याला मुंबई लोकलमध्ये काही पुरुष मंडळींच्या ग्रुपला गाताना पाहण्याचे भाग्य लाभले, ज्यामुळे त्याचा प्रवास एका संगीत कार्यक्रमात (मैफिलमध्ये) बदलला. तसेच त्यांच्या ऊर्जेने युजरला ‘जेव्हा तुम्ही अपेक्षा करता तेव्हा जादू घडते’ या गोष्टीची आठवण करून दिली.

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Mohd Shahid Deshnoor (@ideshnoor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ideshnoor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत आणि ‘१० रुपयांच्या तिकिटात १००० रुपये किमतीच्या तिकीट असणाऱ्या कॉन्सर्टचा आनंद घ्या’, ‘असे चांगले लोक फक्त मुंबईतच आढळतात’, ‘ किती वाजताची ट्रेन पकडली होती’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत. तसेच याआधीसुद्धा या ग्रुपची अनेक गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.